Mind Detox चे 'हे' प्रभावी जपानी तंत्र तुम्हाला माहितीये? ट्राय करून पाहा, मनाला मिळेल शांततेचा अनुभव

Body Detox, Digital Detox यासोबतच Mind Detox हा शब्द देखील सध्या वारंवार कानी पडत आहेत. आपल्या शारीरिर, मानसिक आरोग्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. सध्या Mind Detox करण्याच्या जपानी पद्धतीची चर्चा सुरू आहे. या पद्धती अगदी सोप्या मात्र खूपच प्रभावी आहेत. चला समजून घेऊया एकूण संकल्पना काय?
Mind Detox चे 'हे' प्रभावी जपानी तंत्र तुम्हाला माहितीये? ट्राय करून पाहा, मनाला मिळेल शांततेचा अनुभव
प्रातिनिधिक छायाचित्र - Freepik
Published on

Body Detox, Digital Detox यासोबतच Mind Detox हा शब्द देखील सध्या वारंवार कानी पडत आहेत. आपल्या शारीरिर, मानसिक आरोग्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. सध्या Mind Detox करण्याच्या जपानी पद्धतीची चर्चा सुरू आहे. या पद्धती अगदी सोप्या मात्र खूपच प्रभावी आहेत. चला समजून घेऊया एकूण संकल्पना काय?

Mind Detox म्हणजे काय?

जशी आपण शरीराची स्वच्छता करतो, तशीच मनाचीही स्वच्छता गरजेची आहे. Mind Detox म्हणजे मन शुद्ध करणं किंवा मनातून नकारात्मक विचार, ताणतणाव आणि अनावश्यक गोंधळ काढून टाकणं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मनात सातत्याने साठत आलेल्या गोष्टी जसे की जुने दुःख, चिंता, भीती, सततचे विचार, तणाव, आत्मविश्वास कमी करणारे विचार मनातून काढून टाकणे.

Mind Detox कसे करतात?

Mind Detox च्या अनेक पद्धती आहेत. यामध्ये निसर्गाचा सहवास, ध्यान धारणा, संगीत थेरपी, चांगले छंद जोपासणे इत्यादी. योग, प्राणायाम यांचाही Mind Detox करण्यासाठी खूप उत्तम उपयोग होतो. Mind Detox मुळे मन शांत, शुद्ध आणि स्थिर होते. सध्या Mind Detox करण्याच्या काही जपानी पद्धतींची मोठी चर्चा आहे. या पद्धती खूप प्रभावी आणि परिणामकारक ठरत आहेत. जाणून घेऊया काय आहेत या पद्धती...

शिनरिन-योकू (वनस्नान) किंवा Forest Bathing

शिनरिन-योकू किंवा वनस्नानाचा सोपा अर्थ म्हणजे झाडांच्या सानिध्यात वेळ घालवणे. जंगलात शांतपणे चालत राहणे. जंगलाचा अनुभव घेणे. झाडांमुळे निघणाऱ्या नैसर्गिक शांत लहरींमुळे तुमचे मन शांत होते. यामुळे तुमच्या शरीरातील तणावपूर्ण हार्मोन्स चेंज होतात.

झेन (ध्यानधारणा)

झेन ध्यानधारणा एक जपानी ध्यानाची पद्धत आहे. यामध्ये डोळे अर्धवट मिटून शांत बसयाचे असते. मनातले येणारे जाणारे विचाराकडे फक्त पाहायचे असते. तर त्यात अडकून पडायचे नाही. यामुळे मनात स्पष्टता वाढते.

हे ही वाचा

Mind Detox चे 'हे' प्रभावी जपानी तंत्र तुम्हाला माहितीये? ट्राय करून पाहा, मनाला मिळेल शांततेचा अनुभव
Body detox साठी ताक पंचकर्म कसे करावे? जाणून घ्या योग्य पद्धत
Mind Detox चे 'हे' प्रभावी जपानी तंत्र तुम्हाला माहितीये? ट्राय करून पाहा, मनाला मिळेल शांततेचा अनुभव
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक बनलेले 'डिजिटल डिटॉक्स' म्हणजे काय?

इकिगाई

इकिगाई म्हणजे स्वतःला आणि जगाला किंवा समाजाला उपयोगी पडेल, आनंद देईल असे काम करणे. यामध्ये स्वतःचा शोध घेणे शिकवले जाते. यामुळे तणाव कमी होऊन आयुष्यात उत्साह वाढतो.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in