स्मार्टफोन चार्जरमुळे होऊ शकतो स्फोट? वाचा या 3 महत्त्वाच्या सूचना

आपल्या हातातला फोन हा केवळ एक डिव्हाईस न राहता आपला सगळ्यात जवळचा साथीदार बनलाय. पण, हाच स्मार्टफोन चार्ज करताना जर आपण थोडं दुर्लक्ष केलं... तर?
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

आपल्या हातातला फोन हा केवळ एक डिव्हाईस न राहता आपला सगळ्यात जवळचा साथीदार बनलाय. पण, हाच स्मार्टफोन चार्ज करताना जर आपण थोडं दुर्लक्ष केलं तर? तो चार्जरच जर स्फोटाचा कारणीभूत ठरला, तर?

होय, अशा घटना घडत आहेत आणि त्यामुळेच, तुमचं आणि तुमच्या मोबाईलचं संरक्षण करायचं असेल, तर या ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाच.

१. स्क्वेअर चिन्हाची खात्री करा

चार्जरवर एक छोटं चौकोनी चिन्ह (Square Sign) असतं. हे चिन्ह दर्शवतं की चार्जरमध्ये वापरलेली वायर चांगल्या दर्जाची आहे. हे चिन्ह नसेल, तर अचानक वोल्टेज वाढल्यास आग लागण्याची शक्यता असते.

२. 'होम' साइन असलेला चार्जर फक्त घरीच वापरा

प्रवासात, जसं की ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये, घरच्या वापरासाठी असलेला चार्जर (Home Sign) वापरू नका. अशा वेळी तो अडॅप्टरला सपोर्ट करत नसेल तर तुमचं डिव्हाईस बिघडू शकतं.

३. एम्पेअर व '८' चिन्ह तपासा

चार्जरवर दिलेले एम्पेअर (Amp) वाचून घ्या. जास्त एम्पेअरचा चार्जर सहसा जास्त गुणवत्तेचा असतो. काही चार्जरवर '8' सुद्धा असतो. हेही दर्जेदार चार्जरचं लक्षण आहे.

एकूणच, चार्जिंग करताना नकली चार्जर वापरणं, सतत मोबाईल वापरणं आणि यासंबंधी येणाऱ्या सिग्नलकडे दुर्लक्ष करणं – हे सर्व तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. म्हणूनच, थोडी काळजी घ्या... आणि खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ व्हा!

(Disclaimer: हा लेख इंटरनेटवर उपलब्ध माहितीवर आधारित आहे. याची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in