Sunday Special Recipe : नॉनव्हेज प्रेमींसाठी खास; घरच्या घरी बनवा क्रिस्पी कोळंबी भजी

नॉनव्हेज प्रेमींसाठी कोळंबीपासून बनवलेले पदार्थ नेहमीच खास असतात. त्यापैकी खुसखुशीत 'कोळंबी भजी' हा एक उत्तम स्नॅक्स पर्याय आहे.
Sunday Special Recipe : नॉनव्हेज प्रेमींसाठी खास; घरच्या घरी बनवा क्रिस्पी कोळंबी भजी
(Photo-@sanjeevkapoor)
Published on

रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आणि या दिवशी कुटुंबासोबत काहीतरी खास आणि चविष्ट खाण्याचा आनंद वेगळाच असतो. नॉनव्हेज प्रेमींसाठी कोळंबीपासून बनवलेले पदार्थ नेहमीच खास असतात. त्यापैकी खुसखुशीत 'कोळंबी भजी' हा एक उत्तम स्नॅक्स पर्याय आहे. आगरी-कोळी मसाला, लसूण आणि मसाल्यांचा सुगंध असलेली ही भजी चवीला तिखट, कुरकुरीत आणि स्वादिष्ट लागतात. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा रविवारच्या खास मेनूमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा.

Sunday Special Recipe : नॉनव्हेज प्रेमींसाठी खास; घरच्या घरी बनवा क्रिस्पी कोळंबी भजी
Leftover Chicken Recipe : स्ट्रीट फूडची चव घरीच! झटपट बनवा मसालेदार एग-चिकन रोल! वाचा सोपी रेसिपी

साहित्य :

  • स्वच्छ धुतलेली आणि चिरलेली कोळंबी - दीड कप

  • बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या - २

  • हळद - अर्धा टीस्पून

  • ठेचलेली काळी मिरी - चवीनुसार

  • लाल तिखट - १ टीस्पून

  • बारीक चिरलेला लसूण - १ टीस्पून

  • अ‍ॅग्री कोळी मसाला - २ टीस्पून

  • चिरलेली कोथिंबीर - २ टेबलस्पून

  • बारीक चिरलेला कांदा - १ मध्यम

  • मीठ - चवीनुसार

  • लिंबाचा रस - १ टेबलस्पून

  • तांदळाचे पीठ - अर्धा कप

  • बेसन - अर्धा कप

  • तेल - तळण्यासाठी

  • हिरवी चटणी - सर्व्ह करण्यासाठी

Sunday Special Recipe : नॉनव्हेज प्रेमींसाठी खास; घरच्या घरी बनवा क्रिस्पी कोळंबी भजी
मराठवाडा स्टाईल येसूर मसाला मटण करी; घरच्या घरी बनवा स्पेशल डिश, जाणून घ्या रेसिपी

कृती :

एका भांड्यात कोळंबी घ्या. त्यात हिरवी मिरची, हळद, काळी मिरी, लाल तिखट, लसूण, आगरी-कोळी मसाला, कोथिंबीर, कांदा, मीठ आणि लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करा. हे मिश्रण ५ ते १० मिनिटे मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवा. आता त्यात तांदळाचे पीठ आणि बेसन घालून चांगले मिसळा. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून मिश्रण तयार करा. कढईत तेल गरम करा. तयार मिश्रणाचे छोटे भाग तेलात सोडून मध्यम आचेवर सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत तळा. भजी तेलातून काढून टिश्यू पेपरवर ठेवा. गरमागरम कोळंबी भजी हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Sunday Special Recipe : नॉनव्हेज प्रेमींसाठी खास; घरच्या घरी बनवा क्रिस्पी कोळंबी भजी
तुम्हीही रिकाम्या पोटी चहा-कॉफी घेताय? वेळीच सावध व्हा; नाहीतर होतील गंभीर परिणाम, वाचा तज्ज्ञांचा इशारा

टिप्स :

  • चांगल्या चवीसाठी ताजी कोळंबी वापरा.

  • तांदळाचे पीठ घातल्याने भजी कुरकुरीत बनतात.

  • तेल मध्यम तापमानावर ठेवा, त्यामुळे भजी व्यवस्थित शिजतात.

  • लिंबाचा रस घातल्याने कोळंबीची चव अधिक वाढते.

  • सर्व्ह करताना वरून चाट मसाला किंवा कोथिंबीर घालू शकता.

logo
marathi.freepressjournal.in