वर्कआउट करूनही थकवा वाटतोय? 'या' ५ सुपरफूड कॉम्बिनेशन्समुळे ऊर्जा मिळवा आणि फिट राहा!

आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत थकवा आणि कमजोरी ही समस्या अनेकांना होते. दिवसभराच्या कामात शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि त्यामुळे संध्याकाळी शरीर आणि मन दोन्ही थकल्यासारखे वाटते.
वर्कआउट करूनही थकवा वाटतोय? 'या' ५ सुपरफूड कॉम्बिनेशन्समुळे ऊर्जा मिळवा आणि फिट राहा!
Published on

आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत थकवा आणि कमजोरी ही समस्या अनेकांना होते. दिवसभराच्या कामात शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि त्यामुळे संध्याकाळी शरीर आणि मन दोन्ही थकल्यासारखे वाटते. विशेषतः जे लोक वर्कआउट करत असतात, त्यांना योग्य आहार घेणे अत्यावश्यक असते.

तज्ज्ञांच्या मते, वर्कआउटपूर्वी आणि नंतर योग्य आहार घेतल्यास केवळ शरीराला ऊर्जा मिळते असे नाही, तर स्नायूंची (मसल्स) रिकव्हरीही वेगाने होते आणि दीर्घकाळ थकवा जाणवत नाही. चला तर मग, जाणून घेऊया अशी काही फायदेशीर आणि नैसर्गिक फूड कॉम्बिनेशन्स, जे तुमचं वर्कआउट अधिक प्रभावी आणि आरोग्यदायी बनवू शकतात.

वर्कआउटपूर्वी - केळं आणि बदाम

वर्कआउटपूर्वी घेण्यासाठी पहिला उपयुक्त पर्याय आहे केळं आणि बदाम. केळ्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे वर्कआउटसाठी तात्काळ ऊर्जा देतात. त्याचबरोबर बदाममधील हेल्दी फॅट्स आणि प्रथिने तुमचं स्टॅमिना टिकवून ठेवण्यास मदत करतात.

वर्कआउटपूर्वी - दही आणि ओट्स

दुसरा कॉम्बिनेशन म्हणजे दही आणि ओट्स. हे संयोजन हलकं असून पचनास सुलभ आहे. दह्यामुळे शरीराला आवश्यक प्रोटीन मिळतं आणि प्रोबायोटिक्स पचनसंस्थेस मदत करतात, तर ओट्स संथगतीने ऊर्जा देतात.

वर्कआउटनंतर - डाळ-भात आणि थोडं तूप

वर्कआउटनंतरच्या आहारात डाळ-भात आणि थोडं तूप हे एक उत्तम पारंपरिक कॉम्बिनेशन आहे. डाळ आणि भात एकत्र घेतल्यास शरीराला संपूर्ण प्रथिनांचा (complete protein) लाभ मिळतो. त्यावर थोडं तूप घातल्यास स्नायूंच्या सूजेमध्ये आराम मिळतो आणि शरीर लवकर रिकव्हर होतं.

वर्कआउटनंतर - ज्यूस आणि उकडलेली अंडी

चौथं कॉम्बिनेशन आहे फळांचा ज्यूस आणि उकडलेली अंडी. वर्कआउटनंतर शरीरातील ग्लायकोजन पातळी पुन्हा भरून काढण्यासाठी फळांचा नैसर्गिक ज्यूस उपयुक्त ठरतो. उकडलेल्या अंड्यांतील प्रथिने स्नायूंची दुरुस्ती करण्यात मदत करतात.

कधीही घेण्यासारखं कॉम्बिनेशन

शेवटचं आणि कधीही घेण्यासारखं कॉम्बिनेशन म्हणजे स्मूदी - दूध, केळं आणि ड्रायफ्रूट्स. ही स्मूदी शरीराला प्रथिने, फायबर्स, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स एकत्र देते. वर्कआउटपूर्वी किंवा नंतर ती झटपट ऊर्जा आणि पोषण देणारी आहे.

वर्कआउटनंतर होणारा थकवा, मसल्स पेन किंवा ऊर्जा कमी होण्याची तक्रार अनेक जण करतात. मात्र यावर उपाय अत्यंत सोपा आहे - योग्य आणि वेळेवर आहार. वर्कआउटच्या आधी आणि नंतर हे नैसर्गिक फूड कॉम्बिनेशन्स आहारात समाविष्ट केल्यास तुमचं शरीर सक्रिय, ताजं आणि फिट राहू शकतं. फक्त थोडी जागरूकता आणि आहारात छोटासा बदल आणि तुमचं आरोग्य एक पाऊल पुढे जाईल!

(Disclaimer: हा लेख इंटरनेटवर उपलब्ध माहितीवर आधारित आहे. याची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in