Sweater Washing Tips : नवीन स्वेटर लवकर खराब होतोय? धुताना होणाऱ्या 'या' चुका वेळीच टाळा

हिवाळ्यात स्वेटर आणि लोकरीचे कपडे धुताना काही चुका केल्यास त्यांचा आकार बिघडू शकतो. जाणून घ्या स्वेटर धुण्याची योग्य पद्धत आणि कपड्यांची मऊपणा टिकवण्यासाठी ५ महत्त्वाच्या टिप्स.
Sweater Washing Tips : नवीन स्वेटर लवकर खराब होतोय? धुताना होणाऱ्या 'या' चुका वेळीच टाळा
Sweater Washing Tips : नवीन स्वेटर लवकर खराब होतोय? धुताना होणाऱ्या 'या' चुका वेळीच टाळा'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण स्वेटर, कार्डिगन आणि लोकरीचे कपडे वापरतात. मात्र, नवीन स्वेटर काही वेळा लवकर खराब होऊ लागतो. स्वेटर धुताना केलेल्या काही सामान्य चुकांमुळे त्याचा आकार बदलतो, रंग फिका पडतो किंवा मऊपणा कमी होतो. त्यामुळे महागडे आणि आवडीचे स्वेटर दीर्घकाळ चांगले टिकवायचे असतील, तर ते धुताना योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. जाणून घेऊया स्वेटर धुताना कोणत्या ५ चुका टाळायला हव्यात आणि कपड्यांची काळजी कशी घ्यावी.

Sweater Washing Tips : नवीन स्वेटर लवकर खराब होतोय? धुताना होणाऱ्या 'या' चुका वेळीच टाळा
Ironing Tips : आता इस्त्री करणं होईल अगदी सोपं; वापरा 'या' स्मार्ट ट्रिक्स, कपडे दिसतील नव्यासारखे

१. स्वेटर गरम पाण्यात धुण्याची चूक करू नका

लोकरीचे कपडे स्वच्छ करण्यासाठी अनेकजण गरम पाण्याचा वापर करतात. मात्र, खूप गरम पाण्यामुळे लोकरीच्या धाग्यांची रचना खराब होऊ शकते. परिणामी स्वेटर आकसण्याची किंवा त्याचा मऊपणा कमी होण्याची शक्यता असते. काही कपड्यांचा रंगही फिका पडू शकतो. त्यामुळे स्वेटर धुण्यापूर्वी त्यावरील केअर लेबल तपासा. त्यानुसार थंड किंवा कोमट पाण्याचा वापर करा.

२. स्वेटरमधील पाणी काढण्यासाठी जोरात पिळू नका

स्वेटर धुतल्यानंतर त्यातील पाणी काढण्यासाठी अनेकजण कपडे जोरात पिळतात. मात्र, विशेषतः हाताने विणलेल्या स्वेटरला असं केल्यास त्यातील धागे सैल होऊ शकतात आणि कपड्याचा आकार बिघडू शकतो. त्याऐवजी स्वच्छ टॉवेलवर स्वेटर पसरवा आणि हलक्या हाताने दाब देऊन अतिरिक्त पाणी शोषून घ्या. त्यानंतर सपाट जागेवर किंवा ड्रायिंग नेटवर स्वेटर वाळत ठेवा.

Sweater Washing Tips : नवीन स्वेटर लवकर खराब होतोय? धुताना होणाऱ्या 'या' चुका वेळीच टाळा
Old Bedsheet Hacks : जुने बेडशीट्स फेकू नका! घरातील 'या' कामांसाठी होईल भन्नाट उपयोग

३. लोकरीच्या कपड्यांसाठी साधा डिटर्जंट वापरू नका

सर्व प्रकारचे कपडे एकाच डिटर्जंटने धुणं योग्य नाही. विशेषतः लोकरीचे कपडे धुताना तीव्र रासायनिक घटक असलेले डिटर्जंट वापरणं टाळावं. यामुळे कपड्यांचा मऊपणा कमी होऊ शकतो आणि धाग्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे लोकरीच्या कपड्यांसाठी सौम्य लिक्विड डिटर्जंट वापरा. तसेच डिटर्जंटचा वापर करताना त्यावर दिलेल्या सूचनांचं पालन करा.

४. वॉशिंग मशीनमध्ये हाय स्पिन मोड वापरू नका

वॉशिंग मशीनमध्ये स्वेटर धुताना जास्त स्पिन स्पीड निवडणं हीदेखील एक सामान्य चूक आहे. जास्त वेगाने कपडे फिरल्यामुळे स्वेटरचा आकार बदलू शकतो आणि त्यातील धाग्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे मशीनमध्ये स्वेटर धुण्यापूर्वी केअर लेबल तपासा. मशीन वॉश करण्याची परवानगी असल्यास जेंटल किंवा वूल वॉश मोड निवडा. तसेच हाय स्पिन स्पीड वापरणं टाळा.

Sweater Washing Tips : नवीन स्वेटर लवकर खराब होतोय? धुताना होणाऱ्या 'या' चुका वेळीच टाळा
Clothing Care Tips : जुने कपडेही दिसतील नव्यासारखे; रंग अन् चमक टिकवण्यासाठी करा 'या' गोष्टी

५. स्वेटरवरील डाग ब्रशने जोरात घासू नका

स्वेटरवर डाग पडल्यास तो काढण्यासाठी अनेकजण ब्रशने जोरात घासतात. मात्र, असं केल्यामुळे लोकरीच्या कपड्यांवरील धागे खराब होऊ शकतात. तसेच कपड्यांवर छोटे-छोटे गोळे तयार होतात, ज्यामुळे स्वेटर जुना दिसू लागतो. त्यामुळे डाग पडलेल्या भागावर मऊ कापडाने हलक्या हाताने स्वच्छता करा. डाग काढताना कपडा जास्त घासणं टाळा.

स्वेटर आणि लोकरीचे कपडे दीर्घकाळ चांगले टिकावेत, असं वाटत असेल तर धुताना या छोट्या चुका टाळा. योग्य पद्धतीने स्वच्छता आणि काळजी घेतल्यास कपड्यांचा मऊपणा, रंग आणि आकार टिकवून ठेवण्यास मदत होईल.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)