तमन्ना भाटियाचा 'थुंकी' उपाय : खरंच सकाळची लाळ मुरुमांवर उपयोगी आहे का? जाणून घ्या तथ्य

तमन्ना भाटियाचा 'थुंकी' उपाय : खरंच सकाळची लाळ मुरुमांवर उपयोगी आहे का? जाणून घ्या तथ्य

अभिनेत्री तमन्ना भाटियाचं एक स्टेटमेंट व्हायरल होत आहे. एका मुलाखतीमध्ये ती स्कीन केअरबद्दल सांगताना म्हणते, मी सकाळची पहिली थुंकी पिंपल्सवर लावते. त्यामुळे पिंपल्स बरे होतात. हे तिच्या स्कीन केअरचं सीक्रेट असल्याचे ती सांगते.
Published on

अभिनेत्री तमन्ना भाटियाचं एक स्टेटमेंट व्हायरल होत आहे. एका मुलाखतीमध्ये ती स्कीन केअरबद्दल सांगताना म्हणते, मी सकाळची पहिली थुंकी पिंपल्सवर लावते. त्यामुळे पिंपल्स बरे होतात. हे तिच्या स्कीन केअरचं सीक्रेट असल्याचे ती सांगते. क्षणभर हा विषय विचित्र किंवा विनोदी वाटू शकतो, मात्र यामागे काही प्रमाणात वैज्ञानिक आधार असल्याचं काही संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

लाळेमध्ये असतात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म

नेशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) च्या २०१९ मधील एका संशोधनात असं आढळलंय, की मानवी लाळेमध्ये antimicrobial आणि anti-inflammatory म्हणजेच जंतुनाशक आणि सूज कमी करणारे घटक असतात.

सकाळची लाळ, जी रात्रीच्या विश्रांतीनंतर नैसर्गिकरित्या साचते, ती विशेषतः lysozyme, lactoferrin, peroxidase enzymes आणि immunoglobulins यांसारख्या घटकांनी समृद्ध असते. हे घटक त्वचेवरील सूज कमी करण्यास आणि बॅक्टेरियाचा नाश करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे पिंपल्सवर ही लाळ लावल्यास त्याची सूज आणि जळजळ कमी होऊ शकते, असं काही संशोधक मानतात.

सर्वांसाठी हा उपाय योग्य नाही?

मात्र, हा उपाय सर्वांनाच लागू होतो असं नाही. काही लोकांनी हा उपाय करताना अधिक नुकसान होऊ शकतं.

या लोकांनी हा उपाय टाळावा

  • तोंडाची स्वच्छता (oral hygiene) नीट न राखणारे - अशा लोकांच्या लाळेत हानिकारक बॅक्टेरिया असू शकतात, जे त्वचेवर चट्टे, मुरुम किंवा इन्फेक्शन निर्माण करू शकतात.

  • PCOD असलेल्या महिला - या अवस्थेमध्ये हार्मोनल असंतुलनामुळे लाळेतील घटकांमुळे पिंपल्स अधिक वाढण्याची शक्यता असते.

  • तोंडात जंतुसंसर्ग (oral infection) असलेल्या व्यक्तींनीदेखील हा उपाय टाळावा.

त्वचारोगतज्ञ काय सांगतात?

बहुतेक त्वचारोग तज्ञांचा सल्ला असा आहे की, “लाळ ही नैसर्गिक द्रव आहे आणि त्यात बरेच फायदेशीर घटक असले तरीही, ती थेट चेहऱ्यावर लावणं वैद्यकीय दृष्टिकोनातून शिफारसीय नाही. यामुळे त्वचेच्या संवेदनशील भागांवर अ‍ॅलर्जी किंवा संक्रमण होऊ शकतं. त्यामुळे हे घरगुती उपाय करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे.''

पिंपल्सवर वैज्ञानिकदृष्ट्या शिफारस केलेले उपाय

चेहरा स्वच्छ ठेवा - दिवसातून दोन वेळा माइल्ड फेसवॉशने चेहरा धुवा.

तेलकट आणि मसालेदार अन्न कमी खा - डायटमध्ये फळं, भाज्या आणि कमी साखर असलेले पदार्थ घ्या.

जास्त पाणी प्या - दिवसात किमान ८-९ ग्लास पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते.

डॉक्टरांचा सल्ला घ्या - मुरुमे सातत्याने होत असतील, तर त्वचारोगतज्ञांचा सल्ला घ्या.

तमन्नाचा अनुभव व्यक्तिगत, पण सावधगिरी गरजेची

तमन्ना भाटियाने मुरुमांवर सकाळची लाळ लावून त्यातून फायदा झाल्याचा अनुभव शेअर केला आहे, तो तिच्या वैयक्तिक शरीररचनेनुसार योग्य ठरला असेल. मात्र, तो उपाय सर्वांवर तितकाच परिणामकारक ठरेलच, याची हमी नाही. त्यामुळे असा उपाय करताना तज्ञांचा सल्ला घेणं आणि आपल्या त्वचेच्या प्रकृतीनुसार निर्णय घेणं केव्हाही उत्तम!

( Disclaimer :या सल्ल्यांचा आधार सामान्य माहितीवर आहे. आपल्या शरीराच्या खास परिस्थितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

logo
marathi.freepressjournal.in