टॉयलेटमध्ये फोन वापरताय? ही सवय तुमच्या मेंटल हेल्थसाठी ठरू शकते घातक!

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आपल्यापैकी बहुतेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यावर न्यूज वाचणं, दिवसभर सोशल मीडियावर स्क्रोल करणं आणि झोपण्यापूर्वी व्हिडीओ बघणं. आपल्या मेंदूचा तासन्‌तास फोनच्या स्क्रीनशी संबंध असतो. पण, काही लोक ही सवय इतकी अंगवळणी लावतात, की टॉयलेटमध्येही फोनशिवाय राहू शकत नाहीत.
टॉयलेटमध्ये फोन वापरताय? ही सवय तुमच्या मेंटल हेल्थसाठी ठरू शकते घातक!
Published on

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आपल्यापैकी बहुतेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यावर न्यूज वाचणं, दिवसभर सोशल मीडियावर स्क्रोल करणं आणि झोपण्यापूर्वी व्हिडीओ बघणं. आपल्या मेंदूचा तासन्‌तास फोनच्या स्क्रीनशी संबंध असतो. पण, काही लोक ही सवय इतकी अंगवळणी लावतात, की टॉयलेटमध्येही फोनशिवाय राहू शकत नाहीत.

ही सवय फक्त स्वच्छतेच्या दृष्टिकोनातूनच चुकीची नाही, तर तुमच्या मानसिक आणि मेंदूच्या आरोग्यासाठीही ती अत्यंत घातक ठरू शकते.

टॉयलेटमध्ये फोन वापरण्याचे मेंटल हेल्थवर होणारे परिणाम -

१. मेंटल फॅटीग आणि एंग्जायटी वाढते

टॉयलेटमध्ये शरीर रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करत असतो, पण फोनमुळे मेंदूवर सतत माहितीचा मारा होतो. त्यामुळे न्यूरॉन्स अति सक्रिय होतात आणि मेंदूला योग्य आराम मिळत नाही. परिणामी, मेंटल थकवा आणि एंग्जायटी वाढू शकते.

२. एकाग्रतेची क्षमता होते कमजोर

टॉयलेटमध्ये स्क्रोल करण्याची सवय मेंदूच्या फोकस क्षमतेवर विपरीत परिणाम करते. सतत अर्धवट काम करत राहिल्यासारखे हे वागणं स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रीकरण दोन्ही क्षमतांवर परिणाम करते.

३. तणाव वाढतो

फोनवर कामाशी संबंधित ईमेल्स, नकारात्मक बातम्या किंवा सोशल मीडियावरील माहिती पाहणं, टॉयलेटसारख्या रिलॅक्सिंग ठिकाणीही तुमचा तणावाचा स्तर वाढवतो.

४. मेंदू आणि शरीरातील समन्वय बिघडतो

जर टॉयलेटमध्ये संपूर्ण लक्ष फोनवर असेल, तर मेंदू आणि शरीरातील नैसर्गिक समन्वय बिघडतो. यामुळे पचनक्रियाही प्रभावित होऊ शकते आणि कब्जसारख्या समस्यांचा त्रास होऊ शकतो.

५. डोपामिनची सवय आणि एकटेपणा

सतत छोटे व्हिडीओ किंवा पोस्ट पाहिल्याने मेंदूमध्ये डोपामिन अधिक प्रमाणात निर्माण होतं. त्यामुळे हळूहळू फोनच आनंदाचा एकमेव स्रोत वाटू लागतो, ज्यामुळे सामाजिक संवाद कमी होतो आणि एकटेपणा वाढतो.

या सवयीपासून स्वतःला कसे वाचवाल?

  • टॉयलेटमध्ये फोन नेणे पूर्णपणे बंद करा.

  • कंटाळा आला तर एखादी पुस्तक किंवा मासिक वाचा.

  • टॉयलेटला एक मायक्रो ब्रेक स्पेस म्हणून पहा जिथे तुमच्या मेंदूलाही आराम मिळेल.

  • फोनच्या ऐवजी माइंडफुलनेस सराव करा.

  • स्क्रीन टाइम ट्रॅक करणाऱ्या अ‍ॅप्सचा उपयोग करा.

टॉयलेटमध्ये फोन वापरणं ही छोटी वाटणारी सवय तुमच्या मेंदूवर आणि मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम करू शकते. ही सवय वेळीच ओळखा आणि सोडून द्या — तुमच्या आरोग्यासाठीच!

logo
marathi.freepressjournal.in