वेलची वेळेला टॉनिक: छोट्याशा दाण्यात आरोग्याचा मोठा फायदा; तज्ज्ञ सांगतात...

Health Tips : तज्ज्ञांच्या मते, फक्त दोन वेलचीचे दाणे पिण्याच्या पाण्यात टाकून नियमित सेवन केल्यास शरीरातील उष्णता कमी होते, पचन सुधारते आणि...
वेलची वेळेला टॉनिक: छोट्याशा दाण्यात आरोग्याचा मोठा फायदा; तज्ज्ञ सांगतात...
Published on

सगळीकडे सुपरफूड्स आणि महागड्या टॉनिक्सच्या चर्चा असताना, घरच्या सोप्या वेलचीला आपण किती वेळा दुर्लक्ष केले आहे, ह्याचा कधी विचार केला आहे का? फक्त मसाल्यांमध्ये चव वाढवणारी वेलची, प्रत्यक्षात आपल्या शरीरासाठीही वरदान ठरू शकते. आयुर्वेदाचार्य डॉ. मानसी मेहेंदळे धामणकर यांनी अलीकडेच त्यांच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओत वेलचीच्या फायद्यांबद्दल सविस्तर सांगितलं आहे. त्यांच्या मते, दररोज पिण्याच्या पाण्यात फक्त दोन वेलचीचे दाणे टाकून नियमित सेवन केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात.

तोंडातील दुर्गंधी, माऊथ अल्सर्स, व्हाइट डिस्चार्ज, भूक न लागणे, सतत थकवा, अगदी केस गळतीसारख्या समस्यांवर वेलची प्रभावी ठरते. आयुर्वेदाचार्य मानसी सांगतात की, वेलचीमुळे शरीरातील इन्फ्लॅमेशन कमी होते, पचनक्रिया सुधारते आणि तोंडाला येणारा दुर्गंधी लवकरच कमी होतो. उपाशी पोटी पाण्यात वेलची टाकून महिनाभर सेवन केल्यास या परिणामांची लक्षणीय सुधारणा दिसते.

वेलचीमध्ये असलेल्या नैसर्गिक अँटी-इन्फ्लॅमेटरी गुणधर्मामुळे शरीरातील पेशींना आलेली सूज कमी होते आणि चयापचयन क्रिया सुरळीत होते. दररोज थोडे वेलचीचे दाणे पाण्यात टाकून घेतल्यास हे घरगुती टॉनिक तुमच्या शरीरातील दोष दूर करून आरोग्य सुधारण्यास मदत करतो. तज्ज्ञांच्या मते, इतक्या साध्या उपायाने देखील शरीरातील अनेक समस्यांवर मात करता येते, आणि त्यामुळे वेलची आपल्यासाठी खरंच “लहान पण शक्तिशाली” आहे.

logo
marathi.freepressjournal.in