वजन कमी करताय? तर वापरा 'अंडे का फंडा'

अंडे हे प्रथिनांनी भरलेले सुपरफूड मानले जाते. मात्र, वजन कमी करण्याच्या प्रवासात अंडे खावे की नाही, आणि खाल्लंच तर कसं? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. योग्य पद्धतीने अंडे खाल्ल्यास ते वजन कमी करण्यात मदत करू शकतं. उलट, चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास त्याचा परिणाम उलटाही होऊ शकतो.
वजन कमी करताय? तर वापरा 'अंडे का फंडा'
Freepik
Published on

अंडे हे प्रथिनांनी भरलेले सुपरफूड मानले जाते. मात्र, वजन कमी करण्याच्या प्रवासात अंडे खावे की नाही, आणि खाल्लंच तर कसं? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. योग्य पद्धतीने अंडे खाल्ल्यास ते वजन कमी करण्यात मदत करू शकतं. उलट, चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास त्याचा परिणाम उलटाही होऊ शकतो. त्यासाठी वजन कमी ठेवण्यासाठी किंवा वजनवाढ न होऊ देता अंड्याचा योग्य प्रकारे कसा वापर करावा? याच्या उपयुक्त टिप्स जाणून घेऊया.

उकडलेले अंडे -

अंडे हे पोषणतत्त्वांचे पॉवर हाऊस मानले जाते. जर तुम्ही दररोज फक्त २ उकडलेली अंडी खाल्ली, तरीही तुम्हाला भरपूर प्रोटीन, तसेच अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात, जे चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. उकडलेले अंडे कमी कॅलरीमध्ये अधिक प्रोटीन देते, त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

अंड्याचा पांढरा भाग -

वजन कमी करण्यासाठी उकडलेल्या अंड्याचा फक्त पांढरा भाग अधिक फायदेशीर आहे. अंड्याचा पिवळा भाग (योक) प्रथिनांसोबतच फॅट आणि कोलेस्टेरॉलने भरलेला असतो. त्यामुळे वजन कमी करण्याच्या उद्देशाने अंड्याचा पांढराच भाग खाणे हे आरोग्यदृष्ट्या अधिक योग्य ठरते.

फायबरयुक्त अन्नासोबत अंडे खा -

तुम्हाला जर झटपट वजन कमी करायचे असेल तर अंड्यासोबत सॅलड, मोड आलेले मूग/मटकी (स्प्राउट्स) किंवा हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्यास पचनक्रिया सुधारते आणि पोट भरल्यासारखं वाटतं. यामुळे लवकर भूक लागत नाही आणि वजन कमी करण्याच्या दृष्टीने हे संयोजन फायदेशीर ठरते.

प्रमाणात अंडे खा -

अंडे हे आरोग्यदायी असले तरी त्याचंही प्रमाणात सेवन करणं महत्त्वाचं आहे. जास्त अंडी खाल्ल्यास कॅलरी आणि फॅटचं प्रमाण वाढू शकते. रोज १ ते २ अंडी हे प्रमाण योग्य आहे. जर तुम्ही वजन कमी करत असाल, तर फक्त पांढरा भाग खाणं आणि नियंत्रित प्रमाणात अंड्याचं सेवन करणं अधिक फायदेशीर ठरते.

योग्य वेळेत अंडे खा -

अंडे पचनास थोडं जड असते. त्यामुळे रात्री उशिरा अंडे खाणे टाळावे. त्याऐवजी सकाळी नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात अंड्याचा समावेश केल्यास शरीराला दिवसभर उर्जा मिळते आणि ते चांगलं पचते. संध्याकाळी हलके अन्न हवे असेल, तेव्हाही उकडलेले अंडे योग्य पर्याय ठरू शकते.

logo
marathi.freepressjournal.in