Termites Treatment: पावसाळ्यात फर्निचरला वाळवी लागायचा असतो जास्त धोका, वाचवण्यासाठी हे उपाय करा

Ways To Prevent Termites: पावसाळ्यात पाणी आणि ओलसरपणामुळे घरात फर्निचरला वाळवी लागायचा धोका जास्त असतो. वाळवीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुम्ही काही उपाय करणे गरजेचे आहे.
Termites Treatment: पावसाळ्यात फर्निचरला वाळवी लागायचा असतो जास्त धोका, वाचवण्यासाठी हे उपाय करा
Freepik
Published on

Monsoon Furniture Care: पावसाळा म्हणजे पाणी, ओलसरपणा, घरात डास, माश्या, झुरळ आणि वाळवी अशा अनेक प्रकारच्या गोष्टींचा त्रास असतो. या सिजनमध्ये वाळवी (valvi) खूप फास्ट लागते आणि पसरतेही. एकदा का घरात वाळवी लागली तर ती तुमच्या घरात ठेवलेले मौल्यवान फर्निचर नष्ट करू शकतात. वाळवी लाकडाला आतून पोकळ बनवता. ओलाव्यामुळे वळवी भिंतींवरही चढू लागते. जर एखाद्याला घरातील फर्निचर (Termites to Furniture) आणि लाकूड वाळवीपासून वाचवायचे असेल तर घरगुती उपाय करू शकता. नक्की कोणते उपाय केले पाहिजेत हे जाणून (Ways To Prevent Termites) घ्या.

कडुलिंबाचे तेल

कडुनिंबाचे तेल हे फारच गुणकारी असते. हा वाळवीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय आहे. यामुळे फक्त वाळवीच नाही तर डास आणि किडेही पळून जातात. हे नैसर्गिकरित्या वाळवीला नष्ट करते. कडुलिंबाचे तेल जेथे वाळवी लागली असेल तिकडे शिंपडा किंवा फर्निचरवर लावा.

Termites Treatment: पावसाळ्यात फर्निचरला वाळवी लागायचा असतो जास्त धोका, वाचवण्यासाठी हे उपाय करा
Uttarakhand: देवभूमी उत्तराखंडचं सौंदर्य बघायला जायचं आहे? जाणून घ्या IRCTC च्या बजेट फ्रेंडली पॅकेजची माहिती

मीठ वापरा

मीठ हा एक सोप्पा उपाय आहे. मीठ हे वाळवीपासून मुक्त होण्यासाठी प्रभावीपणे काम करते. मिठात वाळवीपासून बचाव करणारे गुणधर्म असतात. जिथे वाळवी असेल तिथे मीठ शिंपडा.

Termites Treatment: पावसाळ्यात फर्निचरला वाळवी लागायचा असतो जास्त धोका, वाचवण्यासाठी हे उपाय करा
Pregnancy Care Tips: निरोगी मातृत्वासाठी गरोदर महिलांच्या वैद्यकीय तपासणी करणे का महत्त्वाचे आहे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या!

व्हिनेगर

वाळवीचा प्रादुर्भाव असल्यास तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. भिंती किंवा फर्निचरवरची वाळवी काढून टाकण्यासाठी व्हिनेगर प्रभावी ठरू शकते. वाळवी दूर करण्यासाठी हा एक नैसर्गिक उपाय आहे. थोडे लिंबू मिसळून व्हिनेगर शिंपडल्याने वाळवी मरते. १-२ दिवसांच्या अंतराने या मिश्रणाची फवारणी करा.

Termites Treatment: पावसाळ्यात फर्निचरला वाळवी लागायचा असतो जास्त धोका, वाचवण्यासाठी हे उपाय करा
Hair Care Tips: पावसाळ्यात केसांचं नुकसान होतंय? 'या' टिप्स करतील मदत

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

logo
marathi.freepressjournal.in