

आजच्या डिजिटल युगात WhatsApp कॉल हा संवादाचा अतिशय सोपा आणि लोकप्रिय मार्ग ठरला आहे. मात्र, WhatsApp कॉलच्या माध्यमातून तुमचं लोकेशन ट्रॅक केलं जाऊ शकतं, हे अनेकांना माहीत नसतं. विशेष म्हणजे, हॅकर्स किंवा स्कॅमर्स तुमचा IP अॅड्रेस वापरून तुमचं अंदाजे लोकेशन शोधू शकतात. त्यामुळेच WhatsApp ने युजर्सच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचं फीचर दिलं आहे, पण ते बहुतांश वेळा बाय डिफॉल्ट बंद असतं.
WhatsApp ने दिलंय सुरक्षिततेचं खास फीचर - 'Protect IP Address in Calls'
WhatsApp वर कॉल करताना तुमचं लोकेशन कोणालाही ट्रॅक करता येऊ नये, यासाठी ‘Protect IP Address in Calls’ हे फीचर ऑन करणं अत्यंत गरजेचं आहे. हे फीचर सक्रिय केल्यानंतर तुमचे सर्व WhatsApp कॉल्स थेट समोरच्या व्यक्तीपर्यंत न जाता कंपनीच्या सर्व्हरद्वारे कनेक्ट होतात. त्यामुळे तुमचा IP अॅड्रेस लपवला जातो आणि लोकेशन ट्रॅक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
हे फीचर ऑन कसं कराल?
सर्वप्रथम WhatsApp ओपन करा.
त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करून Settings मध्ये जा.
Settings मध्ये Privacy हा पर्याय निवडा.
पुढे Advanced या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Protect IP Address in Calls हे फीचर दिसेल.
ते ऑन करताच तुमच्या WhatsApp कॉल्सची सुरक्षा अधिक मजबूत होईल.
WhatsApp युजर्ससाठी आणखी खुशखबर
दरम्यान, WhatsApp युजर्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. आता जर समोरच्या व्यक्तीने तुमचा कॉल उचलला नाही, तर तुम्ही थेट व्हॉइस किंवा व्हिडिओ नोट पाठवू शकता. हा फीचर आयफोनवरील व्हॉइसमेलसारखा असून, कॉल न उचलल्यास तुमचा मेसेज लगेच पोहोचवण्यास मदत करतो. याशिवाय, ग्रुप कॉल स्पीकर सुधारणा आणि डेस्कटॉप युजर्ससाठी नवीन मीडिया टॅबसारखी फीचर्सही लवकरच उपलब्ध होणार आहेत.
एकूणच, WhatsApp वापरत असाल तर सुरक्षिततेकडे दुर्लक्ष न करता ही महत्त्वाची सेटिंग त्वरित ऑन करणं केव्हाही फायद्याचं ठरेल.