

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत महिलांमध्ये पीसीओएस म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम ही समस्या झपाट्याने वाढताना दिसते. अनियमित पाळी, चेहऱ्यावर केस वाढणे, वजन झपाट्याने वाढणे अशा लक्षणांमुळे त्रास अधिक वाढतो. अशावेळी योग्य आहार, सवयी आणि रोजच्या दिनचर्येत योगाचा समावेश केल्यास पीसीओएसवर नियंत्रण मिळवणे खूप सोपे होते.
योगा का महत्त्वाचा?
काही विशिष्ट योगासने हार्मोन्सचे संतुलन राखतात, शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात आणि पेल्विक भागातील रक्तपुरवठा सुधारतात. विशेषतः ओटीपोटाच्या आसपास जमा होणारी चरबी, जी पीसीओएसची प्रमुख कारणांपैकी एक आहे, ती कमी करण्यासाठीही योगा अत्यंत प्रभावी आहे.
PCOS साठी सर्वात फायदेशीर योगासने
१) मलासन
पाय थोडे रुंद ठेवून सॉक्ट स्थितीत बसा.
तळवे बाहेरच्या दिशेला वळलेले असावेत.
कोपरे मांड्यांच्या आतील बाजूस टेकवा.
हे आसन पचन सुधारण्यास आणि ओटीपोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते.
२) भुजंगासन (Cobra Pose)
भुजंगासन सूर्यनमस्काराचा एक महत्त्वाचा भाग असून पाठीचा कणा लवचिक करतो.
पोटावर झोपा आणि शरीराचा वरचा भाग हातांच्या आधाराने उचला.
मान वरच्या दिशेने ताणून ठेवा.
हे आसन पोटाच्या स्नायूंना ताण देऊन वजन नियंत्रणात मदत करते आणि पाठदुखी कमी करते.
३) सेतू बंधनासन (Bridge Pose)
पेल्विक स्नायू (Pelvic floor muscles) मजबूत करण्यासाठी हे आसन उत्तम.
पाठीवर झोपा व दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवा.
कंबर वरच्या दिशेने जास्तीत जास्त उचला.
३० सेकंदांसाठी ही स्थिती धरा.
हे आसन हार्मोन्स संतुलित करण्यात आणि पाठीचा त्रास कमी करण्यास उपयोगी.
चांगली झोप
वजन नियंत्रणासाठी व हार्मोन्स समतोल ठेवण्यासाठी रोज किमान ६ तासांची झोप आवश्यक आहे.
कार्बोहायड्रेट्स कमी करा
ब्रेड, तांदूळ, बटाटे अशा कार्ब-जड पदार्थांचे सेवन कमी करा. आहारात पुढील पदार्थांचा समावेश करा.
अंड्याचा पांढरा भाग
स्प्राउट्स
प्रथिनेयुक्त पदार्थ
कोल्ड्रिंक आणि जंक फूड टाळा
शीतपेये, वेफर्स, फ्राय पदार्थ पीसीओएसची लक्षणे वाढवू शकतात. वजन वाढवतात आणि हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात.
पीसीओएस हा आजच्या काळातील सर्वात सर्वसामान्य जीवनशैली विकारांपैकी एक आहे. मात्र योग्य आहार, पुरेशी झोप आणि दररोज २०-३० मिनिटे योगासने केल्यास यावर सहज नियंत्रण मिळवता येते. शरीराच्या एकूण आरोग्यासाठी आणि हार्मोन्स संतुलनासाठी योगा हा नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहे.