बारावी निकालाच्या सोशल मीडियामध्ये अफवा; विद्यार्थी पालकांमध्ये संभ्रम: निकालाची तारीख लवकरच जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी व मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखांबाबत अफवा सुरू आहेत
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी व मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखांबाबत अफवा सुरू आहेत. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मंडळामधून लवकरच निकालाची तारीख जाहीर होईल, असे मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यात बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत झाली. या परीक्षेसाठी एकूण १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होऊ लागल्या आहेत. काही संकेतस्थळांवर आजच बारावीचा निकाल असून तो चेक करण्याची लिंकही देत आहेत. मात्र या लिंकवर गेल्यावर विद्यार्थी आणि पालकांचा भ्रमनिरास होत आहे.

बारावी निकालाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून निकालाची तारीख लवकरच जाहीर होईल. पालकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in