एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; अमळनेरमध्ये धक्कादायक घटना

अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे पती-पत्नीने दोन मुलांसह धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेने परिसरात खळबळ उडाली.
एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; अमळनेरमध्ये धक्कादायक घटना
एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; अमळनेरमध्ये धक्कादायक घटनाप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

अमळनेर : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील पती-पत्नीसह दोन लहान मुलांनी धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.२७) पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, टाकरखेडा गावावर शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुनील अमृत भिल, त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल तसेच त्यांचा दुसरीत शिकणारा मुलगा सनी आणि अंगणवाडीत जाणारा राज हे चौघे पहाटे चारच्या सुमारास घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी धावत्या रेल्वेखाली झोकून देत जीवन संपवले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; अमळनेरमध्ये धक्कादायक घटना
आत्महत्येची धमकी देणाऱ्या मुलासह आई-वडिलांचा मृत्यू; उंच कड्यावरून तिघेही कोसळले, संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; अमळनेरमध्ये धक्कादायक घटना
रसमलाई खाल्ली अन् घरात राडा! भावाने पत्नीसमवेत दादा-वहिनीवर केला रक्तरंजित हल्ला

कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची चर्चा असली तरी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in