NEET Paper Leak : आणखी एक प्राध्यापिका संशयाच्या भोवऱ्यात

'नीट-यूजी २०२६' पेपरफुटी प्रकरणात राष्ट्रीय परीक्षा संस्थेचा (एनटीए) रसायनशास्त्र विषयाच्या आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिकेची भूमिका केंद्रीय अन्वेषण विभागाच्या रडारवर आली आहे.
NEET Paper Leak : आणखी एक प्राध्यापिका संशयाच्या भोवऱ्यात
NEET Paper Leak : आणखी एक प्राध्यापिका संशयाच्या भोवऱ्यात(संग्रहित छायाचित्र)
Published on

पुणे : 'नीट-यूजी २०२६' पेपरफुटी प्रकरणात राष्ट्रीय परीक्षा संस्थेचा (एनटीए) रसायनशास्त्र विषयाच्या आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिकेची भूमिका केंद्रीय अन्वेषण विभागाच्या रडारवर आली आहे. पुण्यात अटक करण्यात आलेल्या मनीषा हवालदारने संबंधित तज्ज्ञ प्राध्यापिकेचे नाव सीबीआयला दिलेल्या माहितीत घेतले आहे. एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या आणि भाषांतर प्रक्रियेवरही तपासाचा फोकस केंद्रित झाला आहे.

रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांचे पेपर फुटल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. भौतिकशास्त्राचा पेपर फोडणाऱ्या मनीषा हवालदारने एका विद्यार्थ्याला भौतिकशास्त्र विषयातील प्रश्न दिल्याची कबुली दिल्याचे सीबीआयने म्हटले आहे. हे प्रश्न त्यांनी भाषांतर किंवा उलट भाषांतर (रिव्हर्स ट्रान्सलेशन) करून तयार केले होते. विशेष म्हणजे, ही माहिती एनटीए पॅनेलशी संबंधित असलेल्या रसायनशास्त्र विषयाच्या एका तज्ज्ञाच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्याचेही त्यांनी मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

NEET Paper Leak : आणखी एक प्राध्यापिका संशयाच्या भोवऱ्यात
NEET Paper Leak: 'आरसीसी'च्या मोटेगावकरला ठोकल्या बेड्या; ९ दिवसांची सीबीआय कोठडी

कुलकर्णीच्या कोठडीत वाढ

नवी दिल्ली : ‘नीट’ पेपर फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी याच्या पोलीस कोठडीत दिल्ली न्यायालयाने सोमवारी आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. तर दुसरीकडे, या प्रकरणातील अन्य एक आरोपी मनिषा संजय वाघमारे हिची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश अजय गुप्ता यांनी या दोघांची १० दिवसांची रिमांड संपल्यानंतर हा निर्णय दिला. यापूर्वी १६ मे रोजी न्यायालयाने त्यांना १० दिवसांची कोठडी सुनावली होती.

अनेक तज्ज्ञांची चौकशी

'नीट-यूजी २०२६' पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने 'एनटीए'शी संबंधित इतर तज्ज्ञांचाही तपास सुरू केला आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, भाषांतर, रिव्हर्स ट्रान्सलेशन आणि मॉडरेशन प्रक्रियेत सहभागी झालेल्या काही तज्ज्ञांना पुण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सीबीआयच्या पथकाने संबंधितांकडे अनेक तास चौकशी करून त्यांचे मोबाइल संपर्क, परीक्षा प्रक्रियेदरम्यानची भूमिका; तसेच आरोपींशी असलेले त्यांचे संबंध याबाबतची माहिती घेतली. प्राथमिक चौकशीनंतर काहींना सोडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in