म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीसाठी अर्जाला मुदतवाढ

म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनेतील ६ हजार २९४ सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार ७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे.
म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीसाठी अर्जाला मुदतवाढ
Published on

मुंबई : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनेतील ६ हजार २९४ सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार ७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे.

नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळातर्फे घेण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. तसेच १० डिसेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्ज करता येतील. १२ डिसेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. १३ डिसेंबर रोजी अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे.

सदनिकांचे गट

म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत ९३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेतील ४१८ सदनिका 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्वावर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण ३३१२ सदनिकांचा समावेश आहे तसेच १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील १३१ सदनिकांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in