खरातच्या फार्महाउसमधील ‘स्टिंग ऑपरेशन’ हाती; आचाऱ्याकडून काळ्या कृत्यांचा भांडाफोड, CCTV फुटेज ‘एसआयटी’कडे

महिला लैंगिक शोषण, बेनामी मालमत्ता आणि भक्तांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरातचा पाय दिवसेंदिवस खोलात जाताना दिसत आहे.
खरातच्या फार्महाउसमधील ‘स्टिंग ऑपरेशन’ हाती; आचाऱ्याकडून काळ्या कृत्यांचा भांडाफोड, CCTV फुटेज ‘एसआयटी’कडे
खरातच्या फार्महाउसमधील ‘स्टिंग ऑपरेशन’ हाती; आचाऱ्याकडून काळ्या कृत्यांचा भांडाफोड, CCTV फुटेज ‘एसआयटी’कडे(संग्रहित फोटो)
Published on

नाशिक : महिला लैंगिक शोषण, बेनामी मालमत्ता आणि भक्तांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरातचा पाय दिवसेंदिवस खोलात जाताना दिसत आहे. खरातच्या कार्यालयीन ऑफिसबॉयनंतर आता त्याच्या फार्महाऊसवर काम करणाऱ्या आचाऱ्याने (कुक) खरातची काळी कृत्ये उघड केली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, एका सीएने संबंधित कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते, अशी माहिती पुढे आली आहे. खरातविरुद्ध फसवणुकीसह खंडणीबाबत दाखल अठराव्या गुन्ह्यात ‘पेन ड्राइव्ह’, फार्महाउसवरील ‘स्टिंग’, भोंदूगिरीसह अनेक मुद्दे स्पष्ट झाले आहेत.

खरातच्या मिरगाव येथील फार्महाऊसवर महिलांसोबत घडणाऱ्या संशयास्पद प्रकारांचे सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या हाती लागले आहे. सदर व्हिडिओमध्ये खरात महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे दिसून येत असून त्यामुळे त्याच्या विरोधातील लैंगिक शोषणाचे गुन्हे अधिक प्रबळ झाले आहेत. या संशयास्पद व्हिडिओतून आणखी धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता वाढली आहे.

खरातच्या फार्महाउसमधील ‘स्टिंग ऑपरेशन’ हाती; आचाऱ्याकडून काळ्या कृत्यांचा भांडाफोड, CCTV फुटेज ‘एसआयटी’कडे
भोंदू अशोक खरातचा कोठडीतील मुक्काम वाढला; पाचव्या गुन्ह्यात ५ दिवसांची पोलीस कोठडी

खरातचे सीए म्हणून काम केलेले नाही - पोफळे

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ललित पोफळे हे खरात प्रमुख असलेल्या ‘शिवनिका संस्थान’मध्ये विश्वस्त म्हणून कार्यरत होते. तथापि, खरातच्या काळ्या कारनाम्यांचा सुगावा लागल्याने ते ८ऑगस्ट २०२५ रोजीच विश्वस्त पदावरून पायउतार झाले. खरातने पोफळे यांना त्यांच्या माता-पित्याच्या मृत्यूची भीती घातली. हा कथित ‘मृत्युयोग’ टाळण्यासाठी वावी येथील दर्ग्यात तसेच तिरुवनंतपुरमच्या समुद्रकिनारी ‘अवतार पूजा आणि सिद्ध पूजा’ करण्याचे नाटक रचून खारात याने पोफळे यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले. तपासादरम्यान खरातने पोफळे हे त्याचे सनदी लेखापाल (सीए) असल्याचे भासवले होते. मात्र, पोफळे यांनी त्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला. केवळ ‘बँकिंग लोन कन्सल्टंट’ म्हणून आपण जबाबदारी निभावली, खरातचे सीए म्हणून कधीही काम केलेले नाही, असे स्पष्ट करत खरातचे आर्थिक व्यवहार वेगळ्याच व्यक्ती पाहत असल्याचा खुलासा केला आहे.

खरातच्या फार्महाउसमधील ‘स्टिंग ऑपरेशन’ हाती; आचाऱ्याकडून काळ्या कृत्यांचा भांडाफोड, CCTV फुटेज ‘एसआयटी’कडे
अशोक खरात प्रकरणातील साक्षीदार जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू; अपघातात पत्नीही ठार, मुलगा गंभीर जखमी

फार्महाउसमध्ये कुकर्मांचे ‘स्टिंग’

खरात बंद फोनवर पोलिस अधिकाऱ्यांशी बोलण्याचे नाटक करून लोकांना प्रभावित करायचा, हे पोफळेंनी प्रत्यक्ष बघितले आहे. खरातने त्याच्या नाशिकमधील फार्महाउसवर जेवण बनवण्यासाठी स्वयंपाक्याची (कूक) गरज असल्याचे पोफळेंना सांगितले. खरातच्या कुकर्मांच्या संशयावरून पोफळेंनी त्यांच्या ओळखीतील एका तरुणाला कामाला लावले. खरातला संशय नको म्हणून त्या ‘कूक’चा पगार पोफळे स्वतः देत होते. ‘कूक’ने फार्महाउसवर खरातच्या कुकर्मांचे पुरावे संकलित केले. खरात जेव्हा पीडितांना फार्महाउसवर आणायचा तेव्हा ‘कूक’ला सर्व सीसीटीव्ही बंद करायला सांगायचा. खरात मंदिरात येणाऱ्या भाविकांना नागदेवता साक्षात दर्शन देतात, असा बनाव करायचा.

खरातच्या फार्महाउसमधील ‘स्टिंग ऑपरेशन’ हाती; आचाऱ्याकडून काळ्या कृत्यांचा भांडाफोड, CCTV फुटेज ‘एसआयटी’कडे
खरातने उरणमध्ये ४ कोटींची जमीन घेतली फक्त ५८ लाखांत; अटकेच्या दिवशीच व्यवहाराची नोटीस प्रसिद्ध, कोठडीत फेरफार नोंदही मंजूर

‘पेन ड्राइव्ह’मध्ये व्हिडीओ

‘ऑफिस बॉय’च्या गर्भवती पत्नीवर खरातने लैंगिक शोषणाचा प्रयत्न केल्यावर त्याने कुकर्मांची ‘फाइल’ तयार करण्याचे ठरवले. त्याने कॅनडा कॉर्नरच्या कार्यालयात ‘स्पाय कॅमेरा’ लावून गैरकृत्यांचा ‘पेन ड्राइव्ह’ तयार केला. त्यासाठी उमकांत तावडे यांनी ‘ऑफिस बॉय’ला मदत केली होती. परब यांना ‘पेन ड्राइव्ह’बाबत माहिती मिळाली. परबांनी पोफळेंना सांगितल्यानंतर सर्वांनी ‘ऑफिस बॉय’ला पाठिंबा दिला. खरातच्या सर्व गैरकृत्यांचे पुरावे संकलित झाले. तावडेंनी ‘पेन ड्राइव्ह’मध्ये कुकर्मांचे व्हिडीओ भरले.‘पेन ड्राइव्ह’ त्यांच्या मित्रांमार्फत अशोक भालेराव नावाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला. त्यांनी शिर्डी पोलिसांना ‘पेन ड्राइव्ह’ दिल्याचे जासूद यांनी पोफळेंना सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

आठवत नाही' ची बतावणी

दरम्यान, अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असून ‘एसआयटी’द्वारे त्याची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, तो 'आपल्याला काहीच आठवत नाही' अशी बतावणी करून तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती पुढे आली आहे. आधी प्रश्नांना उत्तर देण्यास टाळाटाळ करणारा खरात आता विस्मरणाचे नाटक करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

'मृत्युयोग' टाळण्यासाठी उकळले ८.७६ कोटी

मृत्यूची भीती दाखवून आणि अघोरी प्रथांच्या आधारे तब्बल ८. ७६ कोटी रकमेची खंडणी वसूल केल्याप्रकरणी वरळीचे व्यावसायिक ललित पोफळे यांनी येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातविरोधात तक्रार दाखल केली आहे. महिनाभरापूर्वी पोफळे यांनी शहर आयुक्तालयात तक्रारवजा अर्ज दिला होता, ज्याची दखल घेत पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in