पुण्यातील संतापजनक प्रकार! स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेत आलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेत आलेल्या अल्पवयीन मुलीला एकटे गाठत जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढून नेत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
पुण्यातील संतापजनक प्रकार! स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेत आलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न
Published on

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेत आलेल्या अल्पवयीन मुलीला एकटे गाठत जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढून नेत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना भवानी पेठेमधील एका नामांकित शाळेमध्ये घडली. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे.

देवराज पदम आग्री (वय १९, रा. न्यू मोदी खाना, लष्कर) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता ७४७४, ७५ (१) (i), बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आलेली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या ३० वर्षीय आईने फिर्याद दिली आहे. आरोपी तरुण हा त्याच शाळेतील विद्यार्थी आहे. समर्थ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भवानी पेठ परिसरात ही नामांकित शाळा आहे. पिडीत मुलगी १५ ऑगस्टच्या दिवशी शाळेतील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती. हा कार्यक्रम संपल्यानंतर ती दुसऱ्या मजल्यावर तिची स्कूल बॅग शोधण्यासाठी जात होती. यावेळी आरोपी मुलगा हा मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ उभा होता. त्याने पीडित मुलगी जवळ येताच तिचा जबरदस्तीने हात पकडला. तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढत नेले. यावेळी आरोपी तरुणाने विनयभंग केला. पीडित अल्पवयीन मुलीने आपली कशीबशी सुटका करीत तेथून पळ काढला. घरी केल्यानंतर तिने आईला हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर आईने पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दाखल केली. समर्थ पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक माने करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in