Video : क्रिकेट खेळताना गुप्तांगाला लागला बॉल, पुण्यातील ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

क्रिकेट खेळताना गुप्तांगाला बॉल लागून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
शौर्य खडवे
शौर्य खडवेFPJ

पुणे: क्रिकेट खेळताना गुप्तांगाला चेंडू लागून एका ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुण्यामधील लोहगाव येथे गुरूवारी घडली आहे. शौर्य खडवे असं मृत मुलाचं नाव असून सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

शौर्य खडवे न्यू इंग्लिश स्कूल, रमनबाग येथे सहावीच्या वर्गात शिकत होता. तो आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. त्यानं बॉलिंग करत असताना टाकलेला चेंडू बॅटरनं त्याच्या दिशेनं टोलवला. हा चेंडू थेट शौर्यच्या गुप्तांगावर जाऊन आदळला आणि तो खाली कोसळला. चेंडू लागताच शौर्यचे मित्र तातडीनं त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानं काहीच प्रतिसाद दिला नाही. असं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे.

त्यांनतर शौर्यला तातडीनं जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

म्हणून क्रिकेट खेळताना अबडॉमिनल गार्ड महत्त्वाचं...

क्रिकेट खेळताना फलंदाज आणि यष्टीरक्षकाला क्रिकेट अबडॉमिनल गार्डचा वापर करावा लागतो. त्यामुळं त्यांच्या गुप्तांगाला इजा होण्यापासून वाचते. त्यामुळं क्रिकेट खेळताना अबडॉमिनल गार्ड वापरण्याचा सल्ला दिला जातो.

logo
marathi.freepressjournal.in