पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण: हिमायत बेगला दिलासा नाही

मुंबई : २०१० मध्ये पुण्यातील जर्मन बेकरीच्या आवारात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी हिमायत बेगला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने एकांतवासामुळे कोणताही मानसिक परिणाम होत नाही
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण:  हिमायत बेगला दिलासा नाही
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण: हिमायत बेगला दिलासा नाहीX - @aparanjape
Published on

मुंबई : २०१० मध्ये पुण्यातील जर्मन बेकरीच्या आवारात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी हिमायत बेगला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने एकांतवासामुळे कोणताही मानसिक परिणाम होत नाही असे स्पष्ट करत १२ वर्षे तुरुंगात असल्याने मानसिक आरोग्यावर आघात झाल्याचा दावा करीत बेगने एकांत तुरुंगवासातून बाहेर काढण्याची विनंती फेटाळली.

बेग याला गेली १२ वर्षे नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात एकांत कारावासात ठेवण्यात आले आहे. यामुळे मानसिक आरोग्यावर आघात झाला असल्याचा दावा करीत एकांत तुरुंगवासातून बाहेर काढण्याची विनंती करणारी याचिका एक वर्षा पूर्वी केली होती.

याची खंडपिठाने दखल घेत तपास यंत्रणेचे तसेच बेगच्या मानसिक स्थितीचा अहवाल विचारात घेतला. त्यावरून मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्यासारखी स्थिती नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. बेगने तुरुंगाच्या आवारात कोणतेही काम करण्यास देण्याची विनंती केली होती. त्याची दखल खंडपीठाने घेतली आणि तुरुंग प्रशासनाला बेगला तुरुंग नियमावलीतील तरतुदीनुसार योग्य काम देण्याचे निर्देश देत याचिका फेटाळली.

logo
marathi.freepressjournal.in