मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.६) महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी आर्थिक, सांस्कृतिक, ग्रामीण आणि शहरी क्षेत्रांमध्ये विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली. या बजेटमध्ये संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्राचा विकास, ग्रामीण समृद्धी आणि AI आधारित उन्नत ग्राम योजना, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज व मराठा शौर्य स्मारक, तसेच ऑलिंपिक खेळांसाठी हाय परफॉर्मन्स सेंटर यांसारख्या अनेक उपक्रमांचा समावेश आहे.
शहरी पायाभूत सुविधांमध्ये मेट्रो नेटवर्क विस्तार, भूयारी मार्गांचे आधुनिकीकरण, मुंबई महानगर प्रदेशातील पुनर्विकास आणि नवीन आर्थिक केंद्रांची निर्मिती यांवरही अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. शेतकरी, महिला, खेळाडू, साहित्यप्रेमी व सामान्य नागरिकांसाठी आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रकल्प या बजेटद्वारे साकार होणार आहेत.
अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा:
राष्ट्रीय संत श्री गाडगेबाबा यांचे जन्मस्थान, कर्मभूमी व समाधी यांना जोडणाऱ्या संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सकिटचा विकास करणार
संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान सुरु करणार
कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (AI) मदतीने नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजना राबवणार
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त चवदार तळे, महाड येथील पायाभूत सोयीसुविधांकरीता विकास आराखडा तयार करणार
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करणार
अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारणार
शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध उपाययोजना : ॲग्रीस्टॅकवर १ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांची नोंदणी, विविध योजनांचा पारदर्शक पद्धतीने लाभ यात आदिवासी वनपट्टेधारक शेतकरी यांचाही समावेश असणार, सकस व पोषणयुक्त शेती उत्पादनासाठी 'महाराष्ट्र प्राकृतिक शेती अभियान' राबविणार तसेच ५ लाख हेक्टर क्षेत्र प्राकृतिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा समावेश करणार.
नाशिक येथे रामकाल पथ विकास प्रकल्पउभारणार, राज्यातील तिसरी चित्रनगरी नवरगाव, रामटेक (नागपूर) येथे विकसित करणार, रामटेक (नागपूर) येथे रामसृष्टी व कालिदास सृष्टी उभारली जाणार तसेच महाकवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करणार.
महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी भव्य स्मारक उभारणार.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक उभारणार
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद ॲकेडमी स्थापन करणार
मराठी भाषेतील साहित्य इतर भाषांमध्ये आणि इतर भाषांमधील साहित्य मराठी भाषेत अुवादित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद ॲकेडमी स्थापन करणार
ऑलिम्पिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी हाय परफॉर्मन्स सेंटर सुरू करणार
जिल्हा, तालुका स्तरावरील क्रीडा केंद्राच्या विकासासाठी आर्थिक तरतूद
खेळाडूंसाठी मिशन ॲथलेटिक्स योजना सुरू करणार
१२ खेळांचे राज्यस्तरावर केंद्र उभारणार
विविध मेट्रो प्रकल्पांना मंजुरी : मुंबई, पुणे व नागपूर - ४९० किमी मेट्रोचे जाळे, १७३ किमीच्या मार्गिका खुल्या, येत्या वर्षात ५० किमीचे नियोजन, २०२९ पर्यंत आणखी १६५ किमीचे नियोजन
मुंबई मेट्रो ११ (पूर्णतः भूमिगत) वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया, पुढे धारावी पुनर्वसन प्रकल्प -वांद्रे टर्मिनसपर्यंतचे नियोजन
मुंबई मेट्रो ८- मुंबई व नवी मुंबई विमानतळांना जोडणारा मार्ग, नवी मुंबई मेट्रो २ - तळोजा ते खांदेश्वर
पुणे मेट्रो (टप्पा २) : खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी मार्गावर हडपसर ते लोणी काळभोर व हडपसर बस डेपो ते सासवड या दोन उपमार्गिकांना मान्यता. रामवाडी ते वाघोली ११ किमी मेट्रो प्रकल्पास मान्यता
नवीन नागपूर-व्यापार व वित्तीय केंद्र: नागपूर शहराच्या आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी नवीन नागपूर या नावाने व्यापार व वित्तीय केंद्र विकसित करणार
नागपूर शहराच्या विस्तार व विकासाला चालना देण्यासाठी नागपूर रिंगरोडला मान्यता
मुंबई महानगर प्रदेश - विकासाचे केंद्र: वाढवण, पालघर येथे चौथी मुंबई वसविणार: लॉजिस्टिक्स व वेअर हाऊसिंगसाठी विकास केंद्रांची निर्मिती, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत २० लाख झोपडपट्टी घरांच्या पुनर्विकासासाठी तसेच १० लाख परवडणारी घरे विकसित करण्यासाठी आराखडा तयार करणार
मुंबई महानगर येथे नवीन बेकायदेशीर बांधकामे रोखण्यासाठी जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करुन 'नो न्यू स्लम फ्रेमवर्क' विकसित करणार तसेच इतर शहरांमध्येही पुढे लागू होणार
मुंबई महानगराच्या धर्तीवर 'पुणे, नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर ग्रोथ हब' साठी नीती आयोग रोड मॅप तयार करणार
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भूयारी मार्ग: मुंबईतील ऑरेंज गेट, पूर्व मुक्कमार्ग ते मरीज ड्राईव्ह दरम्यान भूयारी मार्ग डिसेंबर, २०२८ पर्यंत पूर्ण करणार, पूर्व व पश्चिम मुंबईला जोडणाऱ्या गोरेगाव- मुलुंड भूयारी मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम स्तरावर, ठाणे - बोरिवली या भूयारी मार्गाचे काम जून, २०२८ पर्यंत पूर्ण करणार
खारघर तुर्भे या ₹२१०० कोटींच्या भूयारी मार्गाचे काम सप्टेंबर, २०२८ पर्यंत पूर्ण करणार
एकात्मिक भूयारी मार्ग रस्ता प्रकल्प अंतर्गत वांद्रे वरळी सागरी सेतू ते बुलेट ट्रेन स्थानक व वांद्रे-कुर्ला संकुल ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडण्यात येणार
गायमुख फाउंटन हॉटेल ६ किमी भूयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल - भाईंदर ९ किमी उन्नत मार्ग प्रस्तावित
पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा, ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर आधारित ३०० कोटी वृक्ष लागवडीची मोहीम राबविणार
२०४७ मधील पाण्याची संभाव्य गरज विचारात घेऊन पाणी उपलब्धतेची सुनिश्चिती, जल संपत्तीची प्रमाणित व ऑनलाईन माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नाशिक येथे
₹७१.२० कोटी खर्च करून राज्य जल माहिती केंद्र स्थापन करणार
वैनगंगा - मळगंगा योजने अंतर्गत ₹९४,९६८ कोटी किमतीच्या प्रकल्पास मान्यता
वैतरणा व उल्हास खोऱ्यातील ५४ टीएमसी अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे
प्रस्तावित
दमणगंगा- वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पातील ₹१३,४९७ कोटी किमतीच्या कामास मान्यता
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पातील ₹७४६५ कोटी किमतीच्या कामास प्रशासकीय मान्यता
दमणगंगा- एकदरे-गोदावरी नदी जोड प्रकल्पातील ₹२२१३ कोटींच्या कामास मान्यता
बारामती व पुरंदर तालुक्यातील दुष्काळी क्षेत्रास पाणी उपलब्ध करून देण्याकरिता निरा - कन्हानदीजोड प्रकल्प राबविणार
परदेशी नोकरीच्या संधी : जागतिक बँकेच्या सहकार्याने 'दक्ष' महत्त्वकांक्षी प्रकल्प राबविणार
महिमा (महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी ॲण्ड
ॲडव्हान्समेन्ट) संस्थेची स्थापना करणार
तरुणांना परदेशातील नोकऱ्यांसाठी आवश्यक भाषा, कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक मार्गदर्शन देणार
राज्यातील समुपदेशन सेवांचा विस्तार करण्यासाठी ३६ नवदिशा केंद्रे स्थापन करणार