बापच बनला हैवान! बुलढाण्यात जुळ्या मुलींची पित्याने केली हत्या, पत्नीचा राग चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

पती-पत्नीमधील वादाचा परिणाम बऱ्याचदा त्यांच्या मुलांवर होतो. पण, त्यामुळे कोणी आपल्या मुलांची हत्या करेल याचा विचारही करणार नाही. अशाच वादातून बुलढाणा जिल्ह्यात ऐन दिवाळी सणाच्या धामधूमीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली.
बापच बनला हैवान! बुलढाण्यात जुळ्या मुलींची पित्याने केली हत्या, पत्नीचा राग चिमुकल्यांच्या जीवावर बेतला
Published on

पती-पत्नीमधील वादाचा परिणाम बऱ्याचदा त्यांच्या मुलांवर होतो. पण, त्यामुळे कोणी आपल्या मुलांची हत्या करेल याचा विचारही करणार नाही. अशाच वादातून बुलढाणा जिल्ह्यात ऐन दिवाळी सणाच्या धामधूमीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जन्मदात्या पित्यानेच अडीज वर्षांच्या जुळ्या मुलींची रागाच्या भरात हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ही घटना फक्त देऊळगाव राजा तालुकाच नव्हे, तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडवणारी ठरली आहे.

पत्नीचा राग मुलींच्या जीवावर बेतला

रुई (जि. वाशिम) येथील रहिवासी आणि पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करणारा राहुल चव्हाण याने आपल्या दोन जुळ्या मुलींचा गळा कापून निर्दय हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, राहुल चव्हाण आपल्या पत्नी व मुलींना घेऊन घरच्या दिशेने जात होता. प्रवासादरम्यान नवरा-बायकोमध्ये वाद सुरु झाला. या वादामुळे पत्नीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला, तर रागाच्या भरात राहुल आपल्या मुलींसह पुढे निघाला.

स्वत: दिली गुन्ह्याची कबुली

राहुलने खामगाव–जालना मार्गावरील अंढेरा फाटा जवळील जंगलात जाऊन मुलींचा गळा कापून निर्दय हत्या केली. या क्रूर घटनेनंतर राहुलने वाशिम पोलिस स्टेशनमध्ये जाऊन हत्येची कबुली दिली. तत्काळ अंढेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला.

मृत मुलींची नावे अद्याप पोलिसांनी प्रसिद्ध केलेली नाहीत. आरोपी राहुल सध्या अंढेरा पोलीसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in