कांदा निर्यात बंदी उठवून केंद्राचा शेतकऱ्यांना दिलासा; राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रतिक्रिया

निर्यात बंदी होती तरी नाफेडमार्फत कांदा खरेदी केंद्र सुरू करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती.
कांदा निर्यात बंदी उठवून केंद्राचा शेतकऱ्यांना दिलासा; राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबई : कांदा निर्यात बंदी उठवून केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. केंद्राच्या निर्णयाचे स्वागत असून, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे आहे हेच या निर्णयातून स्पष्ट झाले असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली.

दोनच दिवसांपूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि खा. डॉ सुजय विखे-पाटील यांनी केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावेळी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीबाबत गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली होती. निर्यात बंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी तसेच शेतकऱ्याचे होत असलेले अर्थिक नुकसान याकडे मंत्री विखे- पाटील यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, कांदा निर्यात बंदीबाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेवून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश दिला असल्याचे विखे पाटील म्हणाले.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

निर्यात बंदी होती तरी नाफेडमार्फत कांदा खरेदी केंद्र सुरू करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. राज्य सरकारने साडेतीनशेचे अनुदान देण्याचाही निर्णय घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे असल्याचे आजच्या निर्णयातून स्पष्ट झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून झालेल्या निर्णयाचे स्वागत करून विनंती मान्य केल्याने त्यांनी आभार मानले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in