'बेडकाला वाटत मीच...' अजित पवारांनी लगावला बंडखोर राहुल कलाटेंना टोला

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या नाना काटेंना चिंचवड पोटनिवडणुकीच्या उमेदवारी दिल्यानंतर ठाकरे गटाच्या कलाटेंनी भरला अपक्ष म्हणून अर्ज
'बेडकाला वाटत मीच...' अजित पवारांनी लगावला बंडखोर राहुल कलाटेंना टोला

महाविकास आघाडीने पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा नारळ फोडला आहे. अशामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आज पुण्यात जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना महाविकास आघाडीत बंडखोरी करून अप्सकः म्हणून उभे राहिलेले राहुल कलाटेंवरही टीका केली. ते म्हणाले की, "बेडकाला वाटत की मीच फुगलो आहे. पण, त्या फुगलेपणाचे काही खरे नसते," असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

हेही वाचा :

'आदर करतो पण...'; मविआच्या ज्येष्ठ नेत्यांचे फोन येऊनही कलाटे चिंचवड पोटनिवडणूक लढणार

अजित पवार म्हणाले की, "ज्यांचा अर्ज राहिला आहे, तो राहू नये म्हणून शेवटपर्यंत उद्धव ठाकरे, सचिन अहिर आणि प्रत्येकजण प्रयत्न करत होते. कोणीही अपक्ष राहू नका सरळ लढत होऊद्या. कसब्यात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सरळ लढत आहे. ते सांगत होते की, एक लाखांच्यावर मते पडली. पण, ती शिवसेनेची मते होती. यामध्ये बोलवता धनी कोणी दुसराच आहे. कोणतरी सांगितले असेल कीअर्ज काढू नको. विरोधकांना वाटले असेल, राहुल कलाटेंचा अर्ज राहिल्यावर त्यांना निवडणूक सोप्पी जाईल. पण, कृपा करून कोणी रूसु आणि फुगू नका. कसबा आणि चिंचवडमध्ये विजय मिळवायचा आहे." असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in