संजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

Sanjay Nirupam in Shivsena : काँग्रेस नेते व माजी खासदार संजय निरुपम यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
संजय निरूपम
संजय निरूपमANI

लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निरूपम यांनी पत्नी आणि मुलीसह शिवसेनेत प्रवेश केला. संजय निरुपम काही काळापासून काँग्रेस पक्षात नाराज होते. त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी उघडपणे बोलूनही दाखवली होती. खासकरून महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गटानं मुंबईमध्ये अधिक जागा घेतल्यानंतर निरुपम आक्रमक झाले होते. यादरम्यानच त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर आज त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

निरुपम यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्री शिंदे आणि संजय निरुपम यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर संजय निरुपम हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं होतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शुक्रवारी ३ मे रोजी दुपारी आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं निरुपम यांनी सांगितलं होतं. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षाच्या लोकसभेच्या सर्व उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचं आणि त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचं ते म्हणाले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in