धाराशिव : तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली असून, मंदिराच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र सुरक्षा दला’च्या ११६ जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. मंदिर संस्थानने दिलेल्या माहितीनुसार ही सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
धाराशिव : तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ
धाराशिव : तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढसंग्रहित छायाचित्र
Published on

धाराशिव : आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली असून, मंदिराच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र सुरक्षा दला’च्या ११६ जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. मंदिर संस्थानने दिलेल्या माहितीनुसार ही सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

आगामी सण-उत्सवाच्या काळात होणारी मोठी गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या एमएसएफ दलाची मदत घेण्यात आली आहे.

धाराशिव : तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ
Pune : दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तार, स्थलांतराचा वाद पेटला

या सुरक्षा तुकडीत १ निरीक्षक आणि ४ पोलीस उपनिरीक्षकांसह एकूण ६ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी या तुकडीने मंगळवारी तुळजापूर शहरातून रुट मार्च काढला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in