जळगावमध्ये पेट्रोलसाठी एक किमी रांग; गॅस सिलिंडर, रेशन, धान्य वाहतूक डिझेल अभावी ठप्प

पेट्रोल, डिझेलचा जिल्ह्यात पुरेसा साठा आहे. नागरिकांनी पॅनिक होण्याचे कारण नाही, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना करत आहेत.
जळगावमध्ये पेट्रोलसाठी एक किमी रांग; गॅस सिलिंडर, रेशन, धान्य वाहतूक डिझेल अभावी ठप्प
जळगावमध्ये पेट्रोलसाठी एक किमी रांग; गॅस सिलिंडर, रेशन, धान्य वाहतूक डिझेल अभावी ठप्पप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

जळगाव : पेट्रोल, डिझेलचा जिल्ह्यात पुरेसा साठा आहे. नागरिकांनी पॅनिक होण्याचे कारण नाही, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना करत आहेत. तरीही जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर इंधन टंचाई जाणवत असून पेट्रोल पंपांवर एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. डिझेल अभावी गॅस सिलिंडर वाहून नेणारे, रेशनचे धान्य वाहून नेणारे ट्रक थांबलेले होते. सामान्य जीवनावर देखील याचा परिणाम जाणवला.

जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर इंधन टंचाई जाणवत असून पेट्रोल पंपांना आलेले पेट्रोल, डिझेल हे अवघ्या तीन ते चार तासांत संपत आहे. त्यामुळे जळगावकर इंधनासाठी वणवण फिरत असून बहुसंख्या पेट्रोल पंपांवरील इंधन संपल्याचे फलक झळकत आहेत.

इंधन घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर कॅन घेऊन पेट्रोल पंपावर येत असल्याचे दिसत असून यातून मोठ्या प्रमाणावर इंधनाची साठेबाजी होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आले आहे.

जळगावमध्ये पेट्रोलसाठी एक किमी रांग; गॅस सिलिंडर, रेशन, धान्य वाहतूक डिझेल अभावी ठप्प
वाढत्या तापमानामुळे कांदा सडतोय; कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

जिल्हा प्रशासनाने कॅनमध्ये इंधन न देण्याच्या पेट्रोल पंपचालकांना सूचना दिल्या आहेत. काहींनी बॅरेलमधून डिझेल नेल्याच्या घटना समोर आल्या असून केवळ वाहनातच इंधन देण्यात यावे, असे प्रशासनाने पेट्रोल पंपचालकांना लेखी कळवले आहे. या इंधन तुटवड्याचा फटका आता जाणवू लागला आहे. महापालिकेकडून सध्या शहरातील नाल्यांची सफाई होत असून हे सफाईचे काम बंद पडले. अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये जनरेटर्स असून ते डिझेल अभावी बंद पडले असून त्याचा थेट रुग्णांवर परिणाम होत असल्याने डिझेल उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे पत्र आयएमएने प्रशासनाला पाठवले आहे. डिझेल अभावी रेशनचे धान्य वाहतुक करणारे ट्रक, गॅस सिलिंडर वाहतूक करणारे ट्रक हे थांबले आहेत. ग्रामीण भागात शेतीची कामे ही ट्रॅक्टर अभावी खोळंबली आहेत.

जिल्ह्यात इंधन टंचाई नाही

प्रशासनाशी बोलतांना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर इंधन साठा असून टंचाई नाही. मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, मात्र गरजेपेक्षा जास्त नागरिक पॅनिक होऊन इंधन खरेदी करत असल्याने ही स्थिती उद्भवल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी इंधनाची साठेबाजी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले.

logo
marathi.freepressjournal.in