डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल आज

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी निकाल जाहीर होणार आहे.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल आज

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी निकाल जाहीर होणार आहे. या खटल्यात पाच आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले असून हत्येनंतर १० वर्षांनी हे प्रकरण निकाली लागत आहे.

डॉ. दाभोलकर यांची पुण्यातील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शिंदे पुलावर सकाळी सव्वासातच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले व अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या होत्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला पुणे पोलीस, त्यानंतर एसआयटी आणि शेवटी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या हत्या प्रकरणांचा तपास केला आहे.

या गुन्ह्यातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर १५ सप्टेंबर २०२१ ला आरोप निश्चित करण्यात आले. सुरुवातीला या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू होती. त्यानंतर न्यायाधीश नावंदर यांची बदली झाल्याने सध्या पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात २० साक्षीदार तपासले. बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळसिंगीकर, ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ॲड. सुवर्णा आव्हाड यांनी काम पाहिले.

logo
marathi.freepressjournal.in