फडणवीस आणि शिंदे आज करणार सत्तेचा दावा

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आज रात्री किंवा उद्या सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
फडणवीस आणि शिंदे आज करणार सत्तेचा दावा
ANI
Published on

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे देखील आज राजभवनात दाखल झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे भेट घेतली. त्यानंतर ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आज रात्री किंवा उद्या सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

राज ठाकरे यांचे 'हे' ट्विट चर्चेत

दरम्यान, भाजप कोअर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आरोप-प्रत्यारोपाचे सत्र रंगतदार ठरले आणि अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने भाजपचा मार्ग मोकळा झाला.

logo
marathi.freepressjournal.in