
गेले काही दिवस राज्यामध्ये जे काही राज्यनाट्य सुरु होते, त्यावर राज ठाकरे यांची काय प्रतिक्रिया येतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र सध्याच्या राजकीय गोंधळात त्यांची प्रतिक्रिया आली नव्हती, आता शिवसेनेचे सरकार पडल्यानंतर त्यांचे एक ट्विट सर्वांच्या चर्चेमध्ये आले आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर प्रत्यक्ष नाव न घेता हे ट्विट त्याच्यासाठीच आहे असे बोलले जात आहे.
एखादा माणूस आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो,” अशा आशयाची पोस्ट राज ठाकरेंनी शेअर केली आहे. गेल्या दोन महिन्यांत राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला होता.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. राजभवनच्या सूत्रांनी सांगितले की, राज्यपालांनी ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला आणि पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्यास सांगितले.