Heatwave: उष्माघातामुळे होरपळ सुरूच; मुंबईत पारा ३५ ते ३७ अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज

राज्यात उन्हाचा तडाखा कायम असून, पुढील काही दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार नाही, त्यामुळे पुढील काही दिवस ऊन्हाचे चटके सहन करावे लागणार आहे.
Heatwave: उष्माघातामुळे होरपळ सुरूच; मुंबईत पारा ३५ ते ३७ अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज

गिरीश चित्रे / मुंबई

राज्यात उन्हाचा तडाखा कायम असून, पुढील काही दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार नाही, त्यामुळे पुढील काही दिवस ऊन्हाचे चटके सहन करावे लागणार आहे. मुंबईत शनिवारी सांताकुर येथे ३५.५ तापमानाची नोंद झाली. मुंबईत पुढील चार ते पाच दिवस उकाडा कायम राहणार मुंबईत पारा ३५ ते ३७ अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज कुलाबा हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे उष्मा अन् आर्द्रतेमुळे मुंबईकरांचा घामटा निघणार आहे. तर राज्यातील नागपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती, वर्धा आदी भागात पारा ४४ अंश सेल्सिअस पार जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याने मुंबई, ठाणे, रायगड परिसरात प्रचंड उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत. पुढील काही दिवसांत वरुणराजाचे आगमन होणार असे संकेत मिळत असले, तरी पुढील तीन ते चार दिवस उकाड्याचा सामना करावा लागणार असून पारा ३५ ते ३७ अंश सेल्सिअसवर जाईल, असे कुलाबा हवामान विभागाच्या शस्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले. दरम्यान, उष्मा अन् आव्रतमुळे मुंबईसह परिसरातील नागरिकांना घाम फोडणार आहे. दरम्यान, पावसासाठी अनुकूल स्थिती याचा अंदाज रडारच्या माध्यमातून बांधण्यात येतो; मात्र सांताक्रुझ येथील रडार देखभालीसाठी बंद असून, कुलाबा येथील रडार कार्यरत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

८ ते १० दिवसांत मुंबईत पाऊस

फेब्रुवारी महिन्याच्या म्यानतर मुंबई, ठाणे, कल्याण, वैचिवली, रायगड, नागपूर आदी ठिकाणी तापमानात प्रचंड वाढ होत आहे. दैनंदिन वातावरणात ५० ते ६० टक्क्यांपर्यंत आर्द्रतेचे प्रमाण असल्यास उकाडा जास्त प्रमाणात जाणवत नाही; मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्णतेसोबत आर्द्रतेचे प्रमाण वाढत आहे. उष्णता चरून ठेवण्याच्या आर्द्रतेच्या गुणधर्मामुळे तापमान नियमित असले तरी प्रचंड उकाडा जाणावत असल्यामुळेच नागरिकांचा धमटा निधत आहे. दरम्यान, केरळात पाऊस दाखल झाल्याने मुंबईत पुढील ८ ते १० दिवसात मुंबईत पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in