संजय राठोड पुन्हा मंत्री होऊनही माझा त्यांच्याविरोधातील लढा सुरूच - चित्रा वाघ

पूजा चव्हाण यांच्या मृत्यूप्रकरणी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. या आरोपानंतर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता
संजय राठोड पुन्हा मंत्री होऊनही माझा त्यांच्याविरोधातील लढा सुरूच - चित्रा वाघ

महाराष्ट्रामध्ये आज नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाले. बरेच दिवस प्रलंबित असलेला हा शपथविधी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. शिंदे गटातील वादग्रस्त आमदार संजय राठोड यांना या १८ जणांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यांनी आज मंत्रिपदाच्या गोपनीयतेची शपथ घेतली. संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपनेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र यावर टीका करत चित्रा वाघ यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. 

काय म्हणाल्या चित्रा वाघ ?

"पूजा चव्हाण यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेले माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आले, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. संजय राठोड पुन्हा मंत्री होऊनही मी त्यांच्याविरोधातील लढा सुरूच ठेवला आहे. असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे. मी न्याय देवावर विश्वास ठेवीन.... जितेंगे"

पूजा चव्हाण यांच्या मृत्यूप्रकरणी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. या आरोपानंतर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. यावेळी पूजा चव्हाणचे कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल झाले. त्यातील आवाज संजय राठोड यांचा असल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान पूजाचा अपघाती मृत्यू झाल्याचे पोलिसांनी उघड केल्यानंतर संजय राठोड यांना दिलासा मिळाला.

Maharashtra Cabinet Expansion : अखेर राज्याला मंत्रिमंडळ मिळाले, पाहा कोणाची लागली वर्णी

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in