Pune : पायल झांबरे मृत्यूप्रकरणी सासू-सासऱ्यांना अटक

आयटी अभियंता पायल झांबरे यांच्या मृत्यूप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी बुधवारी त्यांच्या सासू आणि सासऱ्यांना अटक केली. मंगल अरविंद झांबरे (५८) आणि अरविंद झांबरे (६८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
Pune : पायल झांबरे मृत्यूप्रकरणी सासू-सासऱ्यांना अटक
Pune : पायल झांबरे मृत्यूप्रकरणी सासू-सासऱ्यांना अटक
Published on: 

पुणे : आयटी अभियंता पायल झांबरे यांच्या मृत्यूप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी बुधवारी त्यांच्या सासू आणि सासऱ्यांना अटक केली. मंगल अरविंद झांबरे (५८) आणि अरविंद झांबरे (६८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पायल यांचे पती अक्षय अरविंद झांबरे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

पायल यांचा सासरी हुंडा, पैसे आणि सोन्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून त्यांनी २ नोव्हेंबर रोजी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पायल यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सासू-सासरे रुग्णालयात दाखल झाले होते. बुधवारी सकाळी उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यात आणून रीतसर अटक करण्यात आली.

Pune : पायल झांबरे मृत्यूप्रकरणी सासू-सासऱ्यांना अटक
Pune : 'मला काही झाल्यास सासू जबाबदार'; मृत्यूपूर्वी पायल झांबरेचा मेसेज, हुंड्यासाठी छळ केल्याचा माहेरच्यांचा आरोप

दरम्यान, पती अक्षय झांबरे याला न्यायालयाने ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील छळाचे आरोप आणि पायल यांच्या मृत्यूशी संबंधित परिस्थितीचा स्वारगेट पोलीस अधिक तपास करत आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)