Pune : अपघाताचे सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार; जय पवार यांची भूमिका, CID तपासाला गती देण्याची मागणी

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे खरे कारण आणि सत्य जनतेसमोर येईपर्यंत या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत राहणार, असा निर्धार त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी बुधवारी व्यक्त केला.
Pune : अपघाताचे सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार; जय पवार यांची भूमिका, CID तपासाला गती देण्याची मागणी
Pune : अपघाताचे सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार; जय पवार यांची भूमिका, CID तपासाला गती देण्याची मागणी
Published on: 

पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे खरे कारण आणि सत्य जनतेसमोर येईपर्यंत या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत राहणार, असा निर्धार त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी बुधवारी व्यक्त केला.

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) सुरू असलेल्या तपासाचा आढावा घेण्यासाठी जय पवार यांनी आमदार विक्रम काकडे यांच्यासह पुण्यातील सीआयडी कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून तपासाची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली कार्यवाही आणि प्रलंबित बाबींची माहिती घेतली.

तपास पूर्ण होण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल, याबाबतही त्यांनी विचारणा केली. चौकशी पारदर्शकपणे आणि विनाविलंब पूर्ण करावी, अशी मागणी जय पवार यांनी केली.

या अपघाताबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका आहेत. त्यामुळे प्रत्येक महत्त्वाच्या बाबीचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. हा विषय केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नसून, अजित पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो नागरिकांच्या विश्वासाशी संबंधित आहे, असे त्यांनी नमूद केले.

या प्रकरणात दिरंगाई न करता दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in