Satara :अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीसह लॉज मालक अटकेत; अवैध प्रकारांवर अंकुशाची मागणी

कराड शहरात अल्पवयीन मुलीला फूस लावून लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीसह लॉज मालकाला अटक करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीसह लॉज मालक अटकेत; अवैध प्रकारांवर अंकुशाची मागणी
अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीसह लॉज मालक अटकेत; अवैध प्रकारांवर अंकुशाची मागणी
Published on

कराड : कराड शहरात अल्पवयीन मुलीला फूस लावून लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीसह लॉज मालकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून लॉजच्या गैरवापरावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणातील आरोपी अशुतोष चंद्रकांत कुंभार (२१) याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच या घटनेत रूम उपलब्ध करून देणारा ओगलेवाडी येथील एस. के. रॉयल पॅलेस लॉजचा मालक शमशुद्दीन रसुल नदाफ (६२) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

लॉज मालकावर कारवाई

होण्याची ही परिसरातील पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मुलीचा शोध घेत सातारा येथून तिला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने तिला पळवून नेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पुढील तपासात लॉजमध्ये रूम उपलब्ध करून दिल्याचे उघड झाल्याने लॉज मालकालाही अटक करण्यात आली.

ही कारवाई राजश्री पाटील (डीवायएसपी) आणि दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस पथकाने केली. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा लॉजेसची नियमित तपासणी करून अवैध प्रकारांना आळा घालावा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या लॉजेस इतक्या निर्जन ठिकाणी का उभारल्या जातात? परवाना देताना प्रशासनाने काय निकष लावले? या ठिकाणी खरोखर प्रवासीच येतात की अन्य अवैध प्रकार सुरू असतात?” असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीसह लॉज मालक अटकेत; अवैध प्रकारांवर अंकुशाची मागणी
पंतप्रधानांच्या बनावट पत्राद्वारे खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक; मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाची कारवाई

‘लॉजेस’वर प्रश्नचिन्ह

दरम्यान, कराड शहराच्या बाहेरील निर्जन भागात मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आलेल्या लॉजेसमध्ये अवैध प्रकार सुरू असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. काही लॉजेस ‘कुंटणखाने’ म्हणून कुप्रसिद्ध झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी असल्याचा दावा केला जात असला, तरी अशा निर्जन ठिकाणी लॉजेस का उभारण्यात आल्या, परवाने देताना प्रशासनाने कोणती दक्षता घेतली, तसेच तेथे नेमके काय प्रकार सुरू असतात याची चौकशी का होत नाही, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in