मुंबई : देशातील २१ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशामधील १०२ जागांसाठी आज (१९ एप्रिल) मतदानाला सुरुवात झाली आहे. यात महाराष्ट्रातील नागपूर, रामटेक, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा आणि गोंदिया या मतदारसंघांचा समावेश आहे. देशभरातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक मोहन भागवत यांनी नागपूर येथे मतदानाचा हक्क बजावला आहे. "मतदान हे आपले कर्तव्य आहे आणि अधिकार देखील आहे. यामुळे देशात १०० टक्के मतदान झालेच पाहिजे. मी मतदान करून पहिले काम केले आहे", अशी पहिली प्रतिक्रिया मोहन भागवत यांनी मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी देखील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजालवला. राज्यस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी देखील मतदान केले. मतदानानंतर भजनलाल शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "लोकशाहीच्या महाकुंभमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. तुमचे मत हे देशाला मजबूत आणि पुढे घेऊन जाण्याचे काम करणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होईल", असा विश्वसाही भजनलाल शर्मा यांनी व्यक्त केला आहे.
पोडेचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी हे मोटरसायकलवर स्वार होऊन मतदान करण्यासाठी आले. एन. रंगास्वामी यांच्या अनोख्या स्टाईलने सर्वांचे लक्षवेधून घेतले. तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मतदान केंद्रावर रांगेत उभे राहून मतदान केले. मतदानानंतर पुष्कर सिंह धामी म्हणाले, "मी सर्वांना आवाहन करतो की, पहिल्यांदा मतदान करा आणि मगच चहापाणी करावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांना दिली आहे. मणिपुर मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी इम्फाळ पूर्वेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. तसेच राजकीय नेतेमंडळीसह सदगुरू जग्गी वासुदेव यांनी मतदान करून मतदान केले.