Maharashtra Lok Sabha Election Results 2024 LIVE: काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष! महायुतीला जबर धक्का

Maharashtra Election Results: महाराष्ट्रात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या मतदारांच्या मनात काय आहे हे आज स्पष्ट होत आहे.
Lok Sabha Election Maharashtra Results 2024 LIVE

Election Results 2024 Live Updates: महाराष्ट्रात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या मतदारांच्या मनात काय आहे हे आज स्पष्ट होत आहे. शिवसेनाआणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीमुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणाचा बाजच बदललेला आहे. ४८ लोकसभा मतदारसंघांत महायुती व महाआघाडीत जोरदार रस्सीखेच दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या मतमोजणी आकेडवारीनुसार, महायुती १८ जागांवर तर महाविकासआघाडी २९ जागांवर आघाडीवर आहे. मविआकडून काँग्रेस सर्वाधिक १३ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेस महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा -

महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी - भाजप १०, शिंदे गट ७, ठाकरे गट ९, शरद पवार गट ७, काँग्रेस १३, अजित पवार गट १ आणि अपक्ष एका जागेवर पुढे आहेत.

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील, संध्याकाळी  ६.३० वाजेपर्यंतची आकडेवारी
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील, संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंतची आकडेवारी
Lok Sabha Election Maharashtra Results 2024 LIVE
बच्चा बडा हो गया! बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

राज्यातील २८९ ठिकाणी ४,३०९ टेबलांवर मतमोजणी होत आहे. राज्यात १४,५०७ जण मतमोजणीसाठी तैनात केले आहेत. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जनता काय कौल देते याकडे सत्ताधारी 'महायुती' व विरोधी 'महाआघाडी'चे लक्ष आहे. (माहिती अपडेट होत आहे.)

> जळगावमधून भाजपच्या स्मिता वाघ विजयी

> उत्तर मध्य मुंबईमधून वर्ष गायकवाड विजयी

> कल्याणमधून श्रीकांत शिंदे विजयी

> नंदुरबारमधून काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी

> दिंडोरीमधून शरद पवार गटाचे भास्कर भगरे विजयी

> ठाण्यातून शिवसेनेचे नरेश मस्के विजयी

> अमरावतीमध्ये कॉग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे विजयी

> नागपूरमधून भाजपचे नितीन गडकरी विजयी

> रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे विजयी

> सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय

> पालघरमधून भाजपचे हेमंत सावरा विजयी

> मुंबई दक्षिणमधून ठाकरे गटाचे अनिल देसाई हे 53,384 मतांनी विजयी

> पुण्यातून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ विजयी

> Shirur Lok Sabha Election Result: शिरूरमधून शरद पवार गटाचे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे विजयी झाले आहेत तर अजित पवार गटातून उमेदवार असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव

> बारामतीत सुप्रिया सुळे यांचा एक लाख मतांनी दणदणीत विजय, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांचा पराभव

> ठाणे आणि कल्याणमध्ये महायुतीने मोठी आघाडी वाढवली असून शिवसेनेचे नरेश म्हस्के हे सेनेचे युबीटीचे राजन विचारे यांच्या विरोधात १,५१,३३० मतांनी आघाडीवर आहेत, तर कल्याणमध्ये वैशाली दरेकर-राणे यांच्या विरोधात श्रीकांत शिंदे १,८१,९२६ मतांनी आघाडीवर आहेत.

> केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईतील भाजपचे उमेदवार पीयूष गोयल म्हणतात, "आम्हाला आशीर्वाद दिल्याबद्दल मला उत्तर मुंबईतील मतदारांचे आभार मानायचे आहेत...."

> दहाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सोलापुरातून १३ हजार ९६६ मतांनी आघाडीवर

> जालनामध्ये रावसाहेब दानवे पिछाडीवर तर कल्याण काळे ७८४८ मतांनी आघाडीवर

> नंदुरबारमधून काँग्रेसचे गोवाल पाडवी ११०७२४ मतांनी आघाडीवर

> दुपारी १ वाजेपर्यंत वाजेपर्यंतचे कल

> बीडमधून पंकजा मुंडेंना झटका बसणार?

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील ( सकाळी ११.३० पर्यंतची मतमोजणी) आकडेवारीनुसार पंकजा मुंडे पिछाडीवर तर बजरंग सोनवणे सुमारे ६ हजार मतांनी पुढे. वाचा सविस्तर....

Lok Sabha Election Maharashtra Results 2024 LIVE
बीडमधून पंकजा मुंडेंना झटका बसणार? बजरंग सोनवणे सुमारे ६ हजार मतांनी पुढे; सकाळी ११.३० पर्यंतची आकडेवारी

> दुपारी १२ वाजेपर्यंत वाजेपर्यंतचे कल

> मुंबई दक्षिण निकाल अपडेट फेरी 8

आठव्या फेरीत शिवसेनेच्या यामिनी 6,068 मतांनी पिछाडीवर पडल्याने शिवसेनेचे (UBT) अरविंद सावंत आघाडीवर आहेत. आठव्या फेरीअखेर सावंत 23,826 मतांनी आघाडीवर आहेत.

अरविंद सावंत- 1,75,285

यामिनी जाधव- 1,51,459

> मुंबई दक्षिण निकाल अपडेट फेरी 7

सातव्या फेरीत शिवसेनेच्या यामिनी 7,806 मतांनी पिछाडीवर पडल्याने शिवसेनेचे (UBT) अरविंद सावंत आघाडीवर आहेत. सातव्या फेरीअखेर सावंत 17,758 मतांनी आघाडीवर आहेत.

अरविंद सावंत- 1,52,463

यामिनी जाधव- 1,34,705

> सकाळी ११.३० वाजता महाराष्ट्रात 'हे' उमेदवार पिछाडीवर

- नवनीत राणा (अमरावती)

- सुनेत्रा पवार (बारामती)

- सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर)

- शोभा बच्छाव (धुळे)

- भूषण पाटील (मुंबई उत्तर)

- मिहीर कोटेचा (मुंबई ईशान्य)

> ठाणे: नरेश गणपत म्हस्के ६२२४६ मतांनी आघाडीवर

नरेश गणपत म्हस्के एकूण मते १९४४४९

राजन बाबुराव विचारे एकूण मते १३२२०३

सकाळी ११ वाजता महाराष्ट्र आघाडीवर/ट्रेंड:

हे उमेदवार आघाडीवर आहेत:

- नितीन गडकरी (नागपूर)

- सुप्रिया सुळे (बारामती)

- पियुष गोयल (मुंबई उत्तर)

- अरविंद सावंत (दक्षिण मुंबई)

- छत्रपती शाहू शहाजी (कोल्हापूर)

- बळवंत वानखडे (अमरावती)

- तटकरे दत्तात्रेय (रायगड)

- रावसाहेब दानवे (जालाना)

> मुंबई दक्षिण मध्य निकाल अपडेट फेरी 7

शिवसेनेचे (UBT) अनिल देसाई यांच्या मतमोजणीच्या सातव्या फेरीअखेर संख्याबळात सातत्यपूर्ण वाढ दिसून येत आहे. सातव्या फेरीअखेर शिवसेनेचे राहुल शेवाळे 19,493 मतांनी पिछाडीवर आहेत.

अनिल देसाई- 1,48,368

राहुल शेवाळे- 1,28,875

> ठाण्यातून शिवसेनेचे नरेश म्हस्के (शिंदे गट) आघाडीवर आहेत.

> सांगलीतून अपक्ष विशाल पाटील पुढे, तर भाजपचे संजय पाटील मागे आहेत.

> साताऱ्यातून काँग्रेसचे शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत, तर भाजपचे उदयनराजे भोसले पिछाडीवर आहेत.

> मुंबई दक्षिण मध्य निकाल अपडेट फेरी 6

शिवसेनेचे (UBT) अनिल देसाई यांनी मतमोजणीच्या सहाव्या फेरीअखेर पाच आकड्यांमध्ये आघाडी घेतल्याने संख्येत सातत्यपूर्ण वाढ होत आहे. पाचव्या फेरीअखेर शिवसेनेचे राहुल शेवाळे 10,848 मतांनी पिछाडीवर आहेत.

अनिल देसाई- 1,23,741

राहुल शेवाळे- 1,12,893

> मुंबई दक्षिण मध्य निकाल अपडेट फेरी 5

मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर शिवसेनेचे (UBT) अनिल देसाई मजबूत झाले आहेत. पाचव्या फेरीअखेर शिवसेनेचे राहुल शेवाळे ८,३७९ मतांनी पिछाडीवर आहेत.

अनिल देसाई- 1,04,172

राहुल शेवाळे- 95,793

> मुंबई दक्षिण मध्य निकाल अपडेट फेरी 4

मतमोजणीच्या चौथ्या फेरीअखेर शिवसेनेचे (UBT) अनिल देसाई आघाडीवर आहेत. चौथ्या फेरीअखेर शिवसेनेचे राहुल शेवाळे ६,५४७ मतांनी पिछाडीवर आहेत.

अनिल देसाई- 82,955

राहुल शेवाळे- 76,408

> मुंबई दक्षिण निकाल अपडेट फेरी 3

शिवसेनेचे (यूबीटी) अरविंद सावंत यांनी तिसऱ्या फेरीत आघाडी कायम ठेवली आहे. शिवसेनेच्या यामिनी जाधव ४ हजार ३६५ मतांनी पिछाडीवर आहेत.

अरविंद सावंत- ६५,१२९

यामिनी जाधव- ६०,७६४

अन्य अपडेट्स

> कोल्हापुरातील काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज १३ हजारांहून अधिक मतांनी पुढे आहेत

> मुंबई दक्षिण मध्य निकाल अपडेट फेरी १

पहिल्या फेरीच्या मतमोजणीत शिवसेनेचे राहुल शेवाळे आघाडीवर आहेत तर शिवसेनेचे अनिल देसाई पहिल्या फेरीअखेर 1613 मतांनी पिछाडीवर आहेत.

अनिल देसाई- 18,807 राहुल शेवाळे- 20,420

> मुंबई दक्षिण निकाल अपडेट फेरी १

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत शिवसेनेच्या यामिनी जाधव आघाडीवर आहेत तर शिवसेनेचे (UBT) दोन वेळा खासदार अरविंद सावंत पिछाडीवर आहेत. अरविंद सावंत- 19,955 यामिनी जाधव- 22,978

> बारामतीत सुनेत्रा पवार मागे, सुप्रिया सुळे ६ हजारांहून अधिक मतांनी पुढे

> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून 2 हजार मतांनी पुढे आहेत.

> ९ वाजेपर्यंतचे कल

> ठाण्यातून नरेश म्हस्के आघाडीवर तर राजन विचारे पिछाडीवर

> नागपूरमधून नितीन गडकरी आघाडीवर

> अमरावतीमधून बळवंत वानखेडे आघाडीवर तर नवनीत राणा पिछाडीवर

> अकोल्यातून काँग्रेसचे अभय पाटील आघाडीवर

> हिंगोलीमध्ये यंत्रामध्ये बिघाड झाल्याने मतमोजणी थांबवण्यात आली आहे.

> दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत आघाडीवर

> सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर

> संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ -

गोंधळाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. तथापि, प्राथमिक माहितीनुसार, मतमोजणी केंद्रावर कॉलिंग एजंट, कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात न आल्यामुळे तणावाची स्थिती झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

> कल्याणमध्ये तांत्रिक प्रॉब्लेममुळे मतमोजणी थांबवण्यात आली आहे.

> बीडमध्ये पंकजा मुडे या आघाडीवर

> महाराष्ट्र : एनडीए २२, इंडिया २३

> ८. ३० वाजेपर्यंतचे कल: राज्यात महायुती २१ आणि मविआ २१ इतर ०

- या जागांची लढत रंजक

महाराष्ट्रात अशा अनेक हायप्रोफाईल जागा आहेत ज्यांवर रंजक लढती पाहायला मिळणार आहेत-

डॉ.श्रीकांत शिंदे (शिवसेना) : कल्याण

अरविंद सावंत शिवसेना (UBT): मुंबई-दक्षिण

राजन बाबुराव विचारे शिवसेना (UBT): ठाणे

गोवळ पाडवी (काँग्रेस) : नंदुरबार

पंकजा मुंडे (भाजप) : बीड

पियुष गोयल (भाजप) : मुंबई-उत्तर

वर्षा गायकवाड (काँग्रेस) : मुंबई उत्तर मध्य

कपिल पाटील (भाजप) : भिवंडी

दानवे रावसाहेब दादाराव (भाजप) : जालना

> महाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये ४८ जागांसाठीची लढत १९ एप्रिलपासून सुरू झाली आणि राज्यात पाच टप्प्यात मतदान झाले. शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे २०२४ रोजी झाले. पहिल्या चार टप्प्यांच्या तारखा अनुक्रमे १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे आणि १३ मे होत्या.जागांच्या बाबतीत संपूर्ण देशभरात महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे

logo
marathi.freepressjournal.in