RSS : संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी कालवश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
RSS : संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी कालवश
Published on

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकारणात आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मधुभाई कुलकर्णी यांनी संघाच्या वाटचालीतील चढउतार अतिशय जवळून पाहिले. १९८४ ते १९९६ या कालावधीत त्यांनी गुजरातमध्ये प्रांत प्रचारक म्हणून जबाबदारी पार पाडली. याच कालावधीत मधुभाईंची भेट नरेंद्र मोदी यांच्याशी झाली. त्यावेळी मोदी संघ प्रचारक म्हणून काम करत होते. मधुभाईंनी मोदींना संघातून भाजपमध्ये पाठवले. यानंतर मोदी भाजपमध्ये सक्रिय झाले.

logo
marathi.freepressjournal.in