महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर भीषण अपघात; तरुण जागीच ठार

महाबळेश्वर तालुक्यातील गुरेघर गावाच्या हद्दीत वॅक्स म्युझियमजवळ सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात वाई तालुक्यातील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत किरण दिलीप पोळ (३६) यांचा जागीच मृत्यू झाला.
महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर भीषण अपघात; तरुण जागीच ठार
महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर भीषण अपघात; तरुण जागीच ठारप्रातिनिधिक फोटो
Published on

कराड : महाबळेश्वर तालुक्यातील गुरेघर गावाच्या हद्दीत वॅक्स म्युझियमजवळ सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात वाई तालुक्यातील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत किरण दिलीप पोळ (३६) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण पोळ यांचा मित्र महाबळेश्वर येथे आला होता. त्याला घेण्यासाठी किरण पोळ हे सोमवार, १ जून रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मित्राची काळ्या रंगाची सुझुकी अ‍ॅक्सेस दुचाकी (क्रमांक MH-11-DQ-6836) घेऊन महाबळेश्वरकडे निघाले होते. पाचगणी-महाबळेश्वर मार्गावरील गुरेघर गावाच्या हद्दीत असलेल्या वॅक्स म्युझियमजवळ ते पोहोचले असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत किरण पोळ रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर संबंधित वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी व स्थानिक नागरिकांनी जखमी किरण पोळ यांना तातडीने उपचारासाठी पाचगणी येथील बेल एअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर भीषण अपघात; तरुण जागीच ठार
Ulhasnagar : मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोघांचा भीषण अपघातात मृत्यू

याप्रकरणी मयत किरण पोळ यांचे चुलत बंधू विशाल सुनील पोळ (३६) यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पाचगणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस हवालदार एस. जी. बाबर यांनी गुन्हा नोंदविला असून, पोलीस उपनिरीक्षक बी. जी. सोनुने पुढील तपास करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in