मुख्यमंत्र्यांविरोधातील कथित आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी जामीन

पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणात मुख्यमंत्री यांच्याविरोधात सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप असलेल्या महादेव विलास बालगुडे यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. कुलकर्णी यांनी नियमित जामीन मंजूर केला.
मुख्यमंत्र्यांविरोधातील कथित आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी जामीन
मुख्यमंत्र्यांविरोधातील कथित आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी जामीनप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पुणे : पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणात मुख्यमंत्री यांच्याविरोधात सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप असलेल्या महादेव विलास बालगुडे यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. कुलकर्णी यांनी नियमित जामीन मंजूर केला.

आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने आदेशात नमूद केले की, नागरिकांना सरकारच्या कामकाजावर भाष्य करण्याचा, त्याची प्रशंसा करण्याचा तसेच टीका करण्याचा घटनात्मक अधिकार आहे.

न्यायालयाने आरोपीच्या सोशल मीडियावरील विविध पोस्टचे स्वतंत्रपणे परीक्षण केल्यानंतर, त्यामध्ये भारताची सार्वभौमता, एकता किंवा अखंडता धोक्यात आणण्याचा अथवा राज्याविरुद्ध युद्ध पुकारण्याचा हेतू प्रथमदर्शनी दिसून येत नसल्याचे निरीक्षण नोंदविले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्रही न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in