Lok Sabha Elections 2024 : तिसऱ्या टप्प्यातील ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध; निवडणूक आयोगाची माहिती

राज्यात तिसऱ्या टप्प्यात ११ मतदारसंघात अनेक दिग्गज नेत्यांमध्ये लढत होणार आहे. यात बारामती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर या मदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागेल आहे.
Lok Sabha Elections 2024 : तिसऱ्या टप्प्यातील ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध; निवडणूक आयोगाची माहिती

मुंबई : देशासह राज्यात लोकसभा निवडणूक रंगात आली आहे. देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात देशातील १२ राज्यात ९४ जागांसाठी मतदान होणार असून महाराष्ट्राच्या ११ मतदारसंघाचा देखील समावेश आहे. यात बारामती, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, माढा, सांगली, सातारा, हातकणंगले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूर या मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. या ११ मतदारसंघात ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाल आहेत. या सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी केल्यानंतर फक्त ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयोगाने दिली आहे. तसेच निवडणूक आयोगाने २०६ उमेदवारांचे अर्ज बाद केले आहेत.

राज्यातील ११ मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज (२२ एप्रिल) ही शेवटची तारीख आहे. यामुळे ११ मतदारसंघातील कोणता मतदारसंघातून कोण आपली उमेदवारी मागे घेणार हे पाहावे लागेल आहे. राज्यात तिसऱ्या टप्प्यात ११ मतदारसंघात अनेक दिग्गज नेत्यांमध्ये लढत होणार आहे. यात बारामती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर या मदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागेल आहे.

११ मतदारसंघातील ऐवढे उमेदवारी अर्ज ठरले वैध

राज्यातील तिसऱ्या टप्प्यात ११ मतदारसंघातील ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, रायगड २१, बारामती- ४६, उस्मानाबाद - ३५, लातूर - ३१, सोलापूर - ३२ , माढा - ३८, सांगली - २५, सातारा - २१, रत्नागिरी -सिंधुदुर्ग - ९ , कोल्हापूर - २७ आणि हातकणंगले मतदारसंघात ३२ या ११ मतदारसंघात ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

या दिग्गज नेत्यांनी भरला उमेदवारी अर्ज

राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील नामांकित लढत होणार आहे. यात माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शुक्रवारी (१९ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, महाविकास आघाडीचे बारामती मतदारसंघातील विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज भरला. तर बारामती मतदारसंघातील सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या असलेल्या सुनेत्रा पवार यांनी देखील गुरुवारी उमेदवारी अर्ज भरला आहे. तसेच माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते-पाटील, धाराशिवमघून अर्चना पाटील, सांगलीतून विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील, साताऱ्यातून उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज या दिग्गजांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in