"आज तुमच्या हक्काचा दिवस..." ; नगरपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान होत असून १४३ सदस्यपदांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे.
"आज तुमच्या हक्काचा दिवस..." ; नगरपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे  नागरिकांना आवाहन
"आज तुमच्या हक्काचा दिवस..." ; नगरपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन
Published on

महाराष्ट्रातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १४३ सदस्यपदांच्या जागांसाठी शनिवारी (२० डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी रविवारी (२१ डिसेंबर) होणार आहे. आज सुरु असणाऱ्या मतदान प्रक्रियेसंबंधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "प्रिय मतदारांनो, आज तुमच्या हक्काचा आणि कर्तव्याचा दिवस आहे. लोकशाहीच्या या महापर्वात सहभागी होऊन मतदानाचे कर्तव्य बजावा आणि आपल्या शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी लोकाभिमुख, गतिशील आणि पारदर्शी टीम निवडून आणा."

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केला होता. त्यानुसार २ डिसेंबर २०२५ रोजी २६३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. उर्वरित ठिकाणी आज मतदान होत आहे. सर्व संबंधित ठिकाणी रविवारी (२१ डिसेंबर) सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल. त्यानंतर निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाईल.

logo
marathi.freepressjournal.in