सरकारी निर्देश धाब्यावर, परदेशी परदेश दौऱ्यावर

परकीय चलनाची बचत करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी मंजूर असलेले असताना देवेंद्र परदेश दौरे रद्द करण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांचे आर्थिक सल्लागार तथा 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ शनिवारी डेन्मार्कच्या अभ्यास दौऱ्यावर रवाना झाले.
सरकारी निर्देश धाब्यावर, परदेशी परदेश दौऱ्यावर
सरकारी निर्देश धाब्यावर, परदेशी परदेश दौऱ्यावर
Published on

मुंबई : परकीय चलनाची बचत करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी मंजूर असलेले असताना देवेंद्र परदेश दौरे रद्द करण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांचे आर्थिक सल्लागार तथा 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ शनिवारी डेन्मार्कच्या अभ्यास दौऱ्यावर रवाना झाले. परदेश दौरे रद्द करण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकाला खुद्द वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच केराची टोपली दाखवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि काटकसरीचे आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विधिमंडळाच्या १२ आमदारांनी जपान, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कान्स फेस्टिवल तर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी १३ मे २०२६ रोजीच्या परिपत्रकाद्वारे अधिकाऱ्यांचे मंजूर परदेश दौरे रद्द करण्याची सूचना केली आहे. मात्र, केंद्रीय गृह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मंजुरी नंतर नगरविकास विभागाने शुक्रवारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या डेन्मार्क दौऱ्यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

सरकारी निर्देश धाब्यावर, परदेशी परदेश दौऱ्यावर
अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय

रॉयल डेन्मार्क एम्बेसीच्या वतीने डेन्मार्क येथे 'टेक्निकल अवेअरनेस व्हिजिट ऑन क्लायमेट स्मार्ट वॉटर' या विषयावर १६ मे ते २४ मे या दरम्यान अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात प्रवीण परदेशी यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव ए. एस. आर. नाईक, सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, उमरेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्राजक्ता आदमाने सहभागी झाले आहेत. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ आज डेन्मार्ककडे रवाना झाले.

logo
marathi.freepressjournal.in