प्रतिनिधी/मुंबई
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात जोरदार कामगिरी करत ३० जागा मिळविल्या आहेत. काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळविल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आघाडीत आता मोठा भाऊ-छोटा भाऊ असा वाद सुरू झाला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस मोठा भाऊ ठरला असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान करत काँग्रेसला इशारा दिला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आघाडीतील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मेहनत घेतली आहे. सर्वांनी मिळून महाविकास आघाडी म्हणून काम केले आहे. कोणाच्या जागा जास्त किंवा कमी येतील हा विचार कोणीच केलेला नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. तेव्हा आघाडीत कोणीही लहान आणि कोणीही मोठा भाऊ नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सुनावले आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार कामगिरी केली. काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस मोठा भाऊ ठरला असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना हा एक महत्त्वाचा पक्ष आहे आणि तो यापुढेही राहील, असे सांगतानाच आम्ही सर्वांनी मिळून महाविकास आघाडी म्हणून काम केले आहे. विधानसभेला देखील याच पद्धतीने आम्ही १८० ते १८५ जागा जिंकू. महाराष्ट्रात जो जिंकेल त्याची जागा, हे धोरण ठरलेले आहे. असे सांगत राऊत यांनी विधानसभेचा महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितला.