खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्येचा थरार; धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्येचा थरार;  धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल
खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्येचा थरार; धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल
Published on

रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची शुक्रवारी (दि.२६) हत्या करण्यात आली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेमकी घटना काय?

मंगेश काळोखे हे आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेले होते. सीसीटीव्ही फुटेजनुसार, मुलांना शाळेत सोडून परत येत असताना हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला. रस्त्यात त्यांना अडवून खाली पाडले. खाली पडल्यानंतर दोन-तीन जणांनी त्यांना घेरले आणि त्यानंतर पाच ते सहा जणांनी त्यांना बेदम मारहाण केली.

या हल्ल्यात हल्लेखोरांनी दगड, तलवारी आणि कोयत्यांचा वापर करत मंगेश काळोखे यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर २४ ते २५ वार केले. हा हल्ला इतका क्रूर होता की मंगेश काळोखे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रकरणाचा पुढील तपास रायगड पोलिसांकडून सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in