अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ नाही; राज्य सरकारचा व्यावसायिक चालकांना इशारा

महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांच्या चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांद्वारे ही अट अधिक स्पष्ट करण्यात आली असून मराठीचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकाचा १५ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ नाही; राज्य सरकारचा व्यावसायिक चालकांना इशारा
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ नाही; राज्य सरकारचा व्यावसायिक चालकांना इशारा 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांच्या चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांद्वारे ही अट अधिक स्पष्ट करण्यात आली असून मराठीचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकाचा १५ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यानंतर त्यांचा परवाना निलंबित केला जाईल, असा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी दिली.

मोटार वाहन सुधारणा नियम २०२६ अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या सुधारणांमध्ये रिक्षा, टॅक्सी तसेच इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या ॲप-आधारित मोटार कॅब आणि त्यांच्या परवाना आणि अधिकृततेशी संबंधित चालक तसेच परमिटधारकांसाठी व्यावहारिक मराठीच्या ज्ञानाची अट असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. नियम २२ मध्ये बदल करून ॲप आधारित इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या मोटार कॅबच्या अधिकृत चालकांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ नाही; राज्य सरकारचा व्यावसायिक चालकांना इशारा
ड्रायव्हर नाही, भागीदार बना! महाराष्ट्रात सुरू होतंय 'नमो सहकार टॅक्सी' ॲप

परमिट नूतनीकरणासाठी व्यवहारिक मराठी आवश्यक

सुधारित नियमांमधील नव्या तरतुदीनुसार, ॲप आधारित इलेक्ट्रॉनिक मीटर बसवलेल्या मोटार कॅबच्या परमिटचे नूतनीकरण करताना परमिटधारकाकडे मराठीचे ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे.

अशी होणार कारवाई

१) चालकाचा परवाना जास्तीत जास्त तीन महिन्यांपर्यंत निलंबित होईल

२) नियमांचे सातत्याने उल्लंघन झाल्यास चालकाचा परवाना रद्द होणार.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in