पुणे : मोशी येथील कचरा डेपोवर घडलेल्या भीषण दुर्घटना प्रकरणी महापालिकेचे मुख्य अभियंता-१ संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांनी या दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश दिले असून प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
८ जुलै २०२६ रोजी मोशी कचरा डेपोवरील कचऱ्याचा प्रचंड ढिगारा अचानक कोसळून शेजारील आरसीसी इमारतीवर पडला होता. या भीषण अपघातात डेपोवर कार्यरत असलेल्या नऊ कंत्राटी कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता, ज्या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते.
या दुर्घटनेनंतर प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनी सादर केलेले खुलासे वस्तुस्थितीवर आधारित नसून ते असमाधानकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आपल्या जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न या अधिकाऱ्यांनी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयुक्तांनी निलंबनाचे पाऊल उचलले. मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर मोशी कचरा डेपोच्या कामकाजावर प्रभावी नियंत्रण आणि पर्यवेक्षण न ठेवल्याचा गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. सुरक्षाविषयक उपाययोजनांकडे केलेले दुर्लक्ष,
आवश्यक खबरदारी न घेणे आणि कर्तव्यात केलेली अक्षम्य हलगर्जी ही त्यांच्या निलंबनामागची मुख्य कारणे आहेत. दुसरीकडे, कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनी पर्यावरणीय नियमांचे पालन करण्यात त्रुटी ठेवल्या आणि देखरेख करण्यात निष्काळजीपणा दाखवला, असे प्रशासनाने नमूद केले आहे.
त्यांच्या कामकाजात प्रथमदर्शनी गंभीर त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांनी या दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध १५ दिवसांच्या आत दोषारोपपत्र सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत हे दोन्ही अधिकारी निलंबित राहतील आणि या कालावधीत त्यांना केवळ शासकीय नियमानुसार निर्वाह भत्ता दिला जाणार आहे. तसेच निलंबनाच्या काळात त्यांना कोणताही खाजगी व्यवसाय किंवा इतर नोकरी करता येणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे(प्रतिनिधी)--मोशी येथील कचरा डेपोवर घडलेल्या भीषण दुर्घटना प्रकरणी महापालिकेचे मुख्य अभियंता-१ संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांनी या दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश दिले असून प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
८ जुलै २०२६ रोजी मोशी कचरा डेपोवरील कचऱ्याचा प्रचंड ढिगारा अचानक कोसळून शेजारील आरसीसी इमारतीवर पडला होता. या भीषण अपघातात डेपोवर कार्यरत असलेल्या नऊ कंत्राटी कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता, ज्या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते.
या दुर्घटनेनंतर प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनी सादर केलेले खुलासे वस्तुस्थितीवर आधारित नसून ते असमाधानकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आपल्या जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न या अधिकाऱ्यांनी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयुक्तांनी निलंबनाचे पाऊल उचलले. मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर मोशी कचरा डेपोच्या कामकाजावर प्रभावी नियंत्रण आणि पर्यवेक्षण न ठेवल्याचा गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे.