आरएसएस आणि भाजपचे आई-मुलासारखे नाते; भाजप गटनेते आ. प्रविण दरेकरांचे प्रत्युत्तर

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित असलेल्या साप्ताहिक विवेकने अजित पवारांशी केलेल्या युतीवरून लेख लिहिला. यावरून विरोधकांनी भाजपाला टिकेचे लक्ष्य करत विधाने केली. विरोधकांच्या या टिकेला भाजप गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
आरएसएस आणि भाजपचे आई-मुलासारखे नाते; भाजप गटनेते आ. प्रविण दरेकरांचे प्रत्युत्तर
Published on

मुंबई : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित असलेल्या साप्ताहिक विवेकने अजित पवारांशी केलेल्या युतीवरून लेख लिहिला. यावरून विरोधकांनी भाजपाला टिकेचे लक्ष्य करत विधाने केली. विरोधकांच्या या टिकेला भाजप गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाते आई आणि मुलाचे आहे. आरएसएस ही आमची मातृत्व संस्था आहे. भाजपा हा त्यांच्या अनेक उपक्रमांपैकी एक राजकीय पक्ष आहे. त्यामुळे आपल्या अपत्याला मार्गदर्शन करण्याचे, दिशा देण्याचे काम आईच्या भूमिकेतून करणे चुकीचे नसते. मुलगा कितीही ताकदवान झाला तरी आईचे प्रेम, जिव्हाळा हवाच असतो. संघाच्या बाबतीतही भाजपाचे नाते तशाच पद्धतीचे आहे आणि राहील.

दरेकर पुढे म्हणाले की, भाजपचा कार्यकर्ता हा अत्यंत परिपक्वतेने घडला आहे. अनेक संकटे, चढउतार भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाहिलेत. म्हणूनच केंद्रात तिसऱ्यांदा भाजपला मोठ्या संख्येने यश मिळताना दिसतेय. संघांचे विवेक साप्ताहिक भाजपला मार्गदर्शक, दिशादर्शक आहे.

logo
marathi.freepressjournal.in