मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भाताण बोगद्यात अपघात; बसची चार वाहनांना धडक; १० जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सुरक्षेच्या अनेक उपाययोजना करूनही अपघात थांबताना दिसत नाहीत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील भाताण बोगद्यात पुण्याकडे निघालेल्या प्रवासी बसने चार वाहनांना धडक दिली. ही घटना शनिवारी सकाळी घडली.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भाताण बोगद्यात अपघात; बसची चार वाहनांना धडक; १० जखमी, दोघांची प्रकृती गंभीर
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भाताण बोगद्यात अपघात; बसची चार वाहनांना धडक; १० जखमी, दोघांची प्रकृती गंभीर
Published on

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सुरक्षेच्या अनेक उपाययोजना करूनही अपघात थांबताना दिसत नाहीत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील भाताण बोगद्यात पुण्याकडे निघालेल्या प्रवासी बसने चार वाहनांना धडक दिली. ही घटना शनिवारी सकाळी घडली. या अपघातात १० जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात एक टेम्पो आणि तीन कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून प्रवासी बस पुण्याच्या दिशेने जात होती. भाताण बोगद्याजवळ बसने पुढे असलेल्या वाहनांना धडक दिली. या धडकेनंतर एकामागोमाग एक अशी चार वाहने अपघातग्रस्त झाली. या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भाताण बोगद्यात अपघात; बसची चार वाहनांना धडक; १० जखमी, दोघांची प्रकृती गंभीर
पुण्यात मुलाचा अपघाती मृत्यू; खड्डयामुळे दुचाकीवरून पडून घडली दुर्घटना, Video

दरम्यान, अपघातामुळे एक्स्प्रेस वेवरील पुणे मार्गिकेवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in