पुण्यात मुलाचा अपघाती मृत्यू; खड्डयामुळे दुचाकीवरून पडून घडली दुर्घटना, Video

महाराष्ट्राच्या विविध भागात पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अनेक निष्पाप नागरिकांना या खड्ड्यांमुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत.
पुण्यात मुलाचा अपघाती मृत्यू; खड्डयामुळे दुचाकीवरून पडून घडली दुर्घटना
पुण्यात मुलाचा अपघाती मृत्यू; खड्डयामुळे दुचाकीवरून पडून घडली दुर्घटनाप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पुणे : महाराष्ट्राच्या विविध भागात पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अनेक निष्पाप नागरिकांना या खड्ड्यांमुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. अनेक लोक जखमी होत आहेत. पुण्यात हिंजवडी येथे खड्ड्यांमुळे एका ११ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ७ वाजता सुमारास ही घटना घडली.

महाळुंगे येथील ग्रीन कोट सोसायटीसमोरील दुर्गा कॅफेजवळ हा भीषण अपघात झाला. वडील, मुलगा आणि मुलगी दुचाकीवरून ट्यूशनला जात होते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी घसरल्याची प्राथमिक माहिती आहे. दुचाकी घसरल्यानंतर ११ वर्षीय मुलगा मागून येणाऱ्या आयशर ट्रकखाली आला. ट्रकखाली आल्याने चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला.

हिंजवडी आयटी पार्कमध्ये रोज ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी आणि नागरिकांनी रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत स्थानिक प्रशासनाला जबाबदार धरले आहे. हिंजवडीजवळील मान येथील रहिवासी असलेला हा मुलगा सोमवारी दुपारी आपल्या क्लासला जाण्यासाठी वडील आणि बहिणीसोबत दुचाकीवरून जात होता.

गुन्ह्यानुसार, हे तिघे नांदे-म्हाळुंगे रस्त्यावरून जात असताना एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली, ज्यामुळे तिघेही खाली पडले. या अपघातात मुलाचा ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.मात्र, या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून येते की, डाव्या बाजूने ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात खराब रस्त्यामुळे दुचाकी घसरली आणि मुलगा ट्रकच्या चाकाखाली आला.अपघाताच्या घटनेनंतर स्थानिक रहिवासी आणि वाहनधारकांनी रस्त्यांच्या वाईट स्थितीबद्दल प्रशासनावर जोरदार टीका करत आपला संताप व्यक्त केला.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. महाळुंगे परिसरातील खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून धोकादायक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी आहे. नाशिक, पुणे या सगळ्याच ठिकाणी खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. नाशिकमध्ये याच खड्डयांच्या मुद्यावरुन काल उद्धव ठाकरे गटाने मोर्चा काढला होता.

गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे जवळपास ५ मृत्यू झाले आहेत. या अपघातात पीडित कुटुंबांनी घरातील कर्ते पुरुष गमावले आहेत. राज्यातील सर्वच भागांमध्ये ही खड्ड्यांची समस्या आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in